Neetu Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) या त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. नीतू या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'जुग जुग जियो' (Jug jugg Jeeyo) या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. सध्या नीतू या त्यांनी घेतलेल्या आलिशान कारमुळे त्या चर्चेत आहेत. नीतू कपूर यांनी मर्सिडीज-मेबॅक GLS  ही (Mercedes-Maybach GLS ) लग्झरी कार घेतली आहे. या कारच्या फिचर्सबाबत आणि किंमतीबाबत जाणून घेऊयात...


गाडीची किंमत


मर्सिडीज-बेंझ लँडमार्क कार MH या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नीतू कपूर आणि त्यांच्या नव्या कारचे फोटो शेअर करण्यात आले आहेत या फोटोमध्ये नीतू कपूर या ब्लू अँड ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसत आहेत. नीतू कपूर यांनी मर्सिडीज-मेबॅक GLS ही गाडी खरेदी केली आहे. या गाडीमध्ये अनेक फिचर्स आहेत. नीतू कपूर यांनी खरेदी केलेल्या मर्सिडीज-मेबॅक GLS या गाडीची किंमत 2.92 कोटी एवढी आहे. 


मर्सिडीज-मेबॅक GLS चे फिचर्स


नीतू कपूर यांनी घेतलेल्या मर्सिडीज-मेबॅक GLS या गाडीमध्ये कम्फर्ट आणि टेक्नोलॉजी यांचे कॉम्बिनेशन आहे. इलेक्ट्रॉनिक स्लायडिंग पॅनारॉमिक सनरुफ, व्हेंटिलेटेड मसाज सिट यांसारखे फिचर्स उपलब्ध आहेत. या गाडीमध्ये ब्लू, एमराल्ड ग्रीन, ब्रिलियंट ब्लू, पोलर व्हाइट, इरिडियम सिल्व्हर आणि मोजावे सिल्व्हर हे कलर ऑप्शन्स आहेत. अर्जुन कपूर, आयुष्मान खुराणा आणि रणवीर सिंह या सेलिब्रिटींकडे देखील ही गाडी आहे. 






नीतू कपूर यांचे चित्रपट 


नीतू कपूर यांच्या 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या जुग जुग जियो या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटात नीतू कपूर यांच्या सोबतच कियारा आडवाणी, वरुण धवन आणि अनिल कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारली. नीतू कपूर या आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. त्यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने बघत असतात.  लेटर टू मिस्टर खन्ना या चित्रपटामधून नीतू या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘यादों की बारात’, ‘हम किसीसे काम नही’, ‘खेल खेल में’ यांसारख्या हिट चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं, ऋषी कपूर आणि नीतू यांनी 10 पेक्षा अधिक चित्रपट हिट दिले. चित्रपटामधील दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Alia-Ranbir Welcome Baby Girl: रणबीर की आलियासारखी? कपूर घराण्यातील छोटी परी दिसते कशी? नितू कपूर म्हणाल्या...