South Actress Nayanthara Income: साऊथ फिल्म इंडस्ट्रीची ‘लेडी सुपरस्टार’ अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) सध्या तिच्या कमाईमुळे खूप चर्चेत आली आहे. नयनतारा ही साऊथ सिनेसृष्टीतील टॉप आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. नुकताच अभिनेत्रीच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. लग्न आणि हनिमून साजरा केल्यानंतर आता अभिनेत्री लवकरच तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटासाठी अभिनेत्रीने भरमसाठ फी आकारली आहे. यामुळे नयनतारा आता साऊथची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.
नयनतारा लवकरच तिच्या 75व्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करणार आहे. नीलेश कृष्णा यांच्या चित्रपटात नयनताराझळकणार आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्रीने सुमारे 10 कोटी रुपये इतकी फी आकारली आहे. नयनतारा साऊथची पहिली अशी अभिनेत्री आहे, जिला एका चित्रपटासाठी 10 कोटींचे मानधन देण्यात आले आहे. 2022 हे वर्ष नयनतारासाठी खूप चांगले गेले. यावर्षी तिने विग्नेश शिवनसोबत लग्नगाठ बांधली असून, लवकरच ती शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
लवकरच 75व्या चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार!
‘लेडी सुपरस्टार’ नयनतारा हिने 2022मध्ये तिच्या वैयक्तिक जीवनात, तसेच व्यवसायात यशाची शिखरे गाठली आहेत. जवळपास दोन दशकांपासून ती साऊथ सिनेमात काम करत आहे. नयनतारा आता तिच्या 75व्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. तसेच, ती लवकरच शाहरुख खानसोबत आगामी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
समंथालाही टाकले मागे
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री नयनतारा एका चित्रपटासाठी 6 ते 7 कोटी रुपये घेते. तिने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीने साऊथसह बॉलिवूडच्या बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. सध्या, नयनतारा साऊथ चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे. या बाबतीत तिने समंथालाही मागे टाकले आहे. समंथाने अलीकडेच अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द राईज' चित्रपटातील 'ऊ अंटवा' या खास गाण्यासाठी 5 कोटी रुपये आकारले आहेत. या गाण्यात तिने जबरदस्त अभिनय आणि डान्स केला आहे.
चित्रपटांशिवाय अतिरिक्त कमाई
नयनतारा केवळ चित्रपटांच्या माध्यमातून कमाई करत नाही. तर, अभिनेत्री देखील एक गुंतवणूकदार देखील आहे. ती राउडी पिक्चर्स प्रोडक्शन कंपनीची मालकही आहे, यात तिचा पती विग्नेश शिवन भागीदार आहे. नयनताराने चाय वाला, द लिप बाम आणि सौदी अरेबियातील तेल कंपनीतही गुंतवणूक केली आहे. चित्रपटाशिवाय देखील ती भरपूर कमाई करते.
हेही वाचा: