Nawazuddin Siddiqui :  अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) 'सेक्रेड गेम्स'ने ( Sacred Games) ओटीटी प्लॅटफॉर्मवर धमाल उडवून दिली होती. या वेब सीरिजमधून नवाझुद्दीन सिद्दीकीने (Nawazuddin Siddiqui) ओटीटीवर पदार्पण केले होते. 'सेक्रेड गेम्स'च्या पहिल्या सीझनला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या सीझनवर लोकांच्या उड्या पडल्या. आता, या वेब सीरिजचा तिसरा सीझन येणार का ( Sacred Games Season 3),  याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. या वेब सीरिजमध्ये गणेश गायतोंडे ही मुख्य भूमिका साकारणाऱ्या नवाझुद्दीन सिद्दीकीने या प्रश्नावर मौन सोडले आहे. 

Continues below advertisement


नवाझुद्दीन सिद्दीकीने नुकतेच ओटीटी प्ले ला दिलेल्या मुलाखतीत सेक्रेड गेम्सवर भाष्य केले. सेक्रेड गेम्सचा तिसरा सीझन येणार नसल्याचे नवाझुद्दीने स्पष्ट केले आहे. यामागील कारणही नवाझुद्दीनने सांगितले आहे. 


'सेक्रेड गेम्स' ही वेब सीरिज विक्रम चंद्रा यांच्या सेक्रेड गेम्स या कादंबरीवर आधारीत आहे. या कांदबरीत एका शहराचे 40 वर्षांचा सामाजिक-राजकीय इतिहास सांगण्यात आला आहे. कथेच्या केंद्रस्थानी मुंबईचे अंडरवर्ल्ड आहे. धर्माचा वापर करून व्यावसायिक, राजकीय लागेबंध यांच्यावरही भाष्य करण्यात आले आहे. या सीरिजला लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. 


तिसरा सीझन का येणार नाही?


नवाझुद्दीन सिद्दीकीने सांगितले की, दोन सीझननंतर दिग्दर्शकाला कंटाळा आला आहे. आता, तिसरा सीझन करू नये असे त्यांना वाटत आहे. या वेब सीरिजमधील कलाकारांनीदेखील तिसऱ्या सीझनला नकार दिला. आता जे झालं ते झाले. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांना देखील तिसरा सीझन करण्याची  इच्छा नाही. क्रिएटीव्ह लोकांना एकच गोष्ट वारंवार करण्यास लगेच कंटाळा येतो. दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी देखील तिसरा सीझन करायचा नाही. अनेकांनी मला 'सेक्रेड गेम्स'च्या तिसऱ्या सीझनबाबत विचारणा केली. पण, आता सेक्रेड गेम्सचा तिसरा सीझन येणार नसल्याचे नवाझुद्दीनने सांगितले. 


तरच, ओटीटीवर काम करणार


ओटीटीवरील वेब सीरिजमध्ये असलेले शिवीगाळ, आक्षेपार्ह भाषा, यावरही नवाजुद्दीनने भाष्य केले. त्याने सांगितले की, या सगळ्याची सुरुवात आम्ही केली होती. पण, आता मला कोणी आक्षेपार्ह भाषा असलेल्या सीरिजमध्ये काम करण्यास सांगितले तर मी त्याला नकार देईल, असेही नवाझुद्दीनने सांगितले. 


सेक्रेड गेम्सची तगडी स्टारकास्ट


सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमध्ये नवाझुद्दीन शिवाय,  सैफ अली खान, कुब्रा सैत, राजश्री देशपांडे, एलनाज नूरानी, कल्की केकलां, पंकज त्रिपाठी,  अमृता सुभाष, गिरीश कुलकर्णी आदी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.