Satrashe Ek Panhala : पावनखिंडनंतर 'सतराशे एक पन्हाळा'(Satrashe Ek Panhala) हा ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेता सुशांत शेलार (Sushant Shelar) मुख्य भूमिकेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगला आता सुरुवात झाली आहे. 



सिनेमाविषयी अभिनेता सुशांत शेलार म्हणाला "आजपर्यंत मी बऱ्याच सिनेमात काम केले आहे. परंतु ऐतिहासिक सिनेमात काम करण्याची संधी कधी मिळाली नाही. 'सतराशे एक पन्हाळा'या सिनेमाच्या निमित्ताने ऐतिहासिक सिनेमात काम करण्याची संधी मला मिळाली आहे. या सिनेमासाठी मी खूप उत्सुक आहे."


ऐतिहासिक सिनेमांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.'ज्यासाठी लढला हर एक मावळा'अशी टॅगलाईन असलेल्या 'सतराशे एक पन्हाळा" या सिनेमात सुशांत व्यतिरिक्त कोणते कलाकार असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ऐतिहासिक सिनेमांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 


व्ही. स. गोगावले प्रॉडक्शन निर्मित 'सतराशे एक पन्हाळा' हा बिग बजेट सिनेमा आहे. या ऐतिहासिक सिनेमाचा मुहूर्त महाशिवरात्रीच्या पावन प्रसंगी भोर येथील राजवाड्यात मोठ्या दिमाखात संपन्न झाला.


'सतराशे एक पन्हाळा' या सिनेमाची निर्मिती स्वप्नील गोगावले करत आहे. या सिनेमाविषयी स्वप्नील गोगावले म्हणाले,"निर्माता म्हणून हा माझा पहिलाच सिनेमा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत त्यामुळे सिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण करताना त्यांच्या काळात घडलेल्या प्रसंगावर एक भव्य ऐतिहासिक सिनेमा करायचा असे स्वप्न पाहिले होते"


संबंधित बातम्या


Divya Agarwal-Varun Sood : वरुण सूद-दिव्या अग्रवालचा ब्रेकअप! सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणते...


Me Vasantrao : सांगीतिक रंगाची उधळण! शंकर महादेवन यांच्या उपस्थितीत रंगला ‘मी वसंतराव’चा संगीत सोहळा!


Kaun Pravin Tambe : 'कौन प्रवीण तांबे' सिनेमात मराठमोळा श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha