मुंबई : दिवंगत अभिनेते राजेश खन्ना हे अत्यंत सामान्य प्रतीचे अभिनेते होते या ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दिन शाह यांच्या विधानावर राजेश खन्नांची मुलगी ट्विंकल खन्ना चांगलीच भडकली होती. त्यामुळे शाह यांनी सपशेल माघार घेत माफी मागितली आहे.


 
माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी माफी मागतो पण माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जातोय असं म्हणत नसिरुद्दिन यांनी संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.


 

नसीरुद्दीन शाहांची राजेश खन्नांवर टीका, ट्विंकलचा करारा जवाब



 

अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी राजेश खन्ना यांच्याविषयी बोलताना अत्यंत सामान्य प्रतीचे अभिनेते असल्याचं मत व्यक्त केलं होतं. यावर ट्विंकल खन्नाने ट्विटरवर संताप व्यक्त केला. 'सर तुम्ही जिवंत माणसांचा आदर करु शकत नाही, तर निदान मृत व्यक्तींचा तरी आदर करा, ते तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही, अशा शब्दात ट्विंकल खन्नाने उत्तर दिलं.