मुंबई : अभिनेत्री नर्गिस फाक्रीला क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 6 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. आगामी बँजो सिनेमाच्या प्रमोशनसाठी नर्गिस अमेरिकेत गेली होती, त्यावेळी हा प्रकार घडला.


 

 

नर्गिसला 9062 डॉलरची रक्कम कार्डमधून काढल्याचा मेसेज आला, तेव्हा हा खुलासा झाला. नर्गिसच्या क्रेडिट कार्डचं क्लोन करुन 14 ट्रँझॅक्शन्स केल्याची माहिती. एकूण 6 लाख रुपयांची लूट करण्यात आल्याचं लक्षात आल्यानंतर सोमवारी तिने मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली.

 

 

कोटक महिंद्रा बँकेचं हे कार्ड असून बँकेने ग्राहकांविषयीची गोपनीय माहिती उघड करण्यास नकार दिला आहे. नर्गिस फाक्री आणि रितेश देशमुख यांचा बहुचर्चित सिनेमा बँजो लवकरच प्रदर्शित होणार आहे.