मुंबई: ऑलिम्पिकसारख्या जागतिक दर्जाच्या स्पर्धेत विजेत्या खेळाडूंना फक्त पदक देणं उचित नाही. तर त्यांना वित्तीय पुरस्कार देणंही गरेजचं आहे. असं स्पष्ट मत बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारनं व्यक्त केलं आहे.
अक्षय कुमार म्हणाला की, 'प्रमाणपत्र मिळवणं किंवा पदक जिंकणं हे एक मोठं यश आहेच. पण तुम्हाला वाटत नाही का पैसा मिळवणं हे अधिक व्यवहार्य आहे? कारण मला असं वाटतं की, जे लोक या स्पर्धेमध्ये भाग घेतात त्यातील बरेच खेळाडू हे गरीब कुटुंबातून आलेले असतात.'
अक्षय पुढे म्हणाला, 'मी अनेकदा पाहिलं आहे की, काहीजण आपलं पदक विकून पैसा मिळवतात. तुम्हीही अशा कहाणी नक्कीच ऐकल्या असतील. त्यामुळे जेव्हा तुम्ही कोणाला सन्मानित करत असाल तेव्हा फक्त पदक देणं योग्य नाही तर त्यासोबत त्या खेळाडूला पैसा देणंही गरजेचं आहे. कारण की, जीवनात व्यावहारिक होणंही गरजेचं आहे.
रिओ ऑलिम्पिकची सांगता 21 ऑगस्टला होणार आहे. मात्र, भारतानं यात अद्याप एकही पदक पटकावलेलं नाही.