मुंबई: बॉलिवूडचा आगामी चित्रपट 'बार-बार देखो'चे ट्रेलर रिलीज झाल्यापासून यू-ट्यूबवर ट्रेडिंगच्या टॉप लिस्टमध्ये आहे. या चित्रपटात कतरीना आणि सिद्धार्थ मल्होत्रा रोमान्स करताना पाहायला मिळणार आहेत.


 

मात्र, या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाल्यापासून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण, चित्रपटाच्या अडीच मिनिटाच्या ट्रेलरमध्येच तब्बल 5 किसिंग सीन दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण चित्रपटात किती किसिंग सीन असतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

या चित्रपटातील 'काला चष्मा' या गीताला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. हे गाणे रिलीज झाल्यापासून 17 दिवसांत तब्बल 9 कोटीपेक्षा जास्त वेळा पाहिले गेले. त्यामुळे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता दिसत आहे.

 

'बार-बार देखो' या चित्रपटासाठी कतरीनाने अनेक हॉट सीन दिले आहेत. हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.