Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) चाहत्याच्या कानाखाली वाजवल्याप्रकरणी चर्चेत आहेत. चाहत्याच्या कानाखाली वाजवतानाचा नानांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण आता या व्हिडीओमध्ये घडलेली घटना ही शूटिंगचा भाग असल्याचं म्हणत नानांनी एक व्हिडीओ शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
अभिनेते नाना पाटेकर सध्या त्यांच्या आगामी 'जर्नी' या सिनेमाचं शूटिंग करत आहेत. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा नानांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती नानांसोबत सेल्फी घेण्यासाठी आलेली असता नाना त्याच्या कानाखाली वाजवत आहेत. नानांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चाहत्याच्या कानाखाली वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नाना पाटेकरांनी एक व्हिडीओ शेअर करत याप्रकरणी स्पष्टीकरण (Nana Patekar Reaction ON Viral Video) दिलं आहे. या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर म्हणाले,"व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत असलेली घटना ही माझ्या आगामी 'जर्नी' या सिनेमाचा भाग आहे. या सिनेमात मी डोक्यावर टोपी घातली असून एक व्यक्ती मला म्हणत आहे,"ए म्हाताऱ्या तुझ्या डोक्यावर असलेली टोपी विकायची आहे का?". त्यावर मी त्या व्यक्तीला मारतो आणि पळवून लावतो".
नाना पाटेकर म्हणाले की,"जेव्हा ही घटना घडली तेव्हा या दृश्याची तालिम सुरू होती. पण कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओ शूट करण्यात आलेल्या व्यक्तीचा शोध सुरू केला पण तोपर्यंत तो मुलगा तिथून निघून गेला होता".
नाना पाटेकर पुढे म्हणाले की,"मी असं कधीच वागत नाही. कधीही कोणावर हात उचलत नाही. उलट लोकांवर खूप प्रेम करतो. पण नकळत झालेल्या चुकीबद्दल मी माफी मागतो. बनारसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असूनही शूटिंगदरम्यान मला अनेक लोकांकडून पाठिंबा मिळत आहे. स्थानिक लोक कोणत्याही प्रकारची तक्रार करत नाही आहेत".
संबंधित बातम्या