EXCLUSIVE : हलगी वाजवत ‘सैराट’चं पोस्टर रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 19 Apr 2016 05:50 PM (IST)
मुंबई : खरं तर चित्रपटाच्या पोस्टरचं रिलीज करायचं असेल, तर मोठी पार्टी होते. सेलिब्रेटी त्याला उपस्थित राहतात. पण या सगळ्या फाटा देत 'सैराट' चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपल्या चित्रपटाचं पोस्टर थेट आपल्या गावात रिलीज केलं आहे. करमाळा या मूळ गावी नागराज मंजुळे यांनी हलगीच्या तालावर नाचत पोस्टर रिलीज केलं आहे. पूर्वीच्या काळी चित्रपट रिलीज झाला की पोस्टर हलगीच्या तालावर नाचवत गावभर मिरवणूक काढली जायची. अगदी तशाच पद्धतीनं हे पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. यापूर्वी फँड्रीचं पोस्टरही नागराज मंजुळे यांनी अशाच पद्धतीनं रिलीज केलं होतं. येत्या 29 तारखेला सैराट चित्रपट रिलीज होतोय. पाहा एक्स्क्लुझिव्ह व्हिडीओ :