'सुलतान'चा टीझर रिलीज, रांगड्या पैलवानाच्या भूमिकेत सलमान
टीझर आणि पोस्टरमधील सलमानचं शरीर ज्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे, ते पाहून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सलमानने सुलतानच्या फर्स्ट लूकचं पोस्टर ट्विटरवर शेअर केलं होतं. पण पोस्टर आणि टीझरमध्ये दिसत असलेलं सलमानचं पीळदार शरीर खरं नसून फोटोशॉप केल्याची शंका उपस्थित केली.
काहींनी सलमानच्या या लूकची थट्टा केली. एवढं खराब फोटोशॉप यापूर्वी कधीच झालं नव्हतं, असं मत ट्विपल्सनी नोंदवलं.
सोशल मीडियावर सलमानच्या बॉडीबाबत सुरु असलेल्या चर्चेनंतर चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी सलमानचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला. या फोटोमध्ये सलमान व्यायाम करताना दिसत आहे. सल्लूच्या शरीरावर प्रश्न उपस्थित करु नये असा प्रयत्न या फोटोद्वारे त्यांनी केला आहे. शिवाय या फोटोतही सलमानच्या शरीराकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे आता फोटो पाहून तुम्हीच ठरवा की खरंच हे फोटोशॉप आहे की सल्लूची मेहनत.
या सिनेमात सलमान खान एका हरियाणाच्या कुस्तीपटूची भूमिकेत आहे. या चित्रपटात अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 'ईद'ला रिलीज होणार आहे.