मुंबई : संगीतकार करण जोसेफने मुंबईतील वांद्रे येथे इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. करण जोसेफ एका महिन्यापूर्वीच मुंबईत मित्रांसोबत स्थायिक झाला होता. 9 सप्टेंबर रोजी त्याने आत्महत्या केली.


आत्महत्या केली त्या दिवशी करण त्याच्या मित्रांसोबत घरात बसून टीव्ही पाहत होता. त्याच वेळी त्याने अचानक खिडकीकडे धाव घेतली आणि उडी मारुन आत्महत्या केली. करणच्या मित्रांनी या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली.

पोलिसांना चौकशीनंतर अद्याप या घटनेप्रकरणी सुसाईड नोट आढळून आलेली नाही. मात्र करण गेल्या काही दिवसांपासून तणावात होता, अशी माहिती आहे. करणच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. करण मूळ बंगळुरुचा आहे.