मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या कमाल खानला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने चांगलाच हिसका दाखवला आहे. कमाल खानचा ट्वीट कोट करुन श्रेयसने तोडीस तोड उत्तर दिले आहे.


श्रेयसच्या ‘पोस्टर बॉईज’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई करत आहे. पहिल्याच दिवसापासून सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. असं असतानाही कमाल खानने सवयीप्रमाणे खालच्या पातळीवर जात ‘पोस्टर बॉईज’ सिनेमा, सनी देओल आणि श्रेयस तळपदेवर टीका केली. धक्कादायक म्हणजे कमालने यात आक्षेपार्ह शब्द  वापरला.



श्रेयस तळपदेने कमाल खानच्या या ट्वीटला तोडीस तोड उत्तर दिलं. श्रेयस म्हणाला, “औकात में रह कमाल खान @#%$. कभी हाथ लगा तो इतनी जोर से पटकूंगा की टप्पा खा के छत से लगेगा. जय महाराष्ट्र.”

कमाल खानला दिलेल्या उत्तरानंतर ट्वीटरवर श्रेयसच्या चाहत्यांनी कमालवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

https://twitter.com/shreyastalpade1/status/906424254626856960