मुंबई : अमेरिकेतून सुट्टीवरुन आलेला दिग्दर्शक अनुराग कश्यप पुन्हा एकदा चर्चेत आहे. सुट्टीदरम्यान अनुराग न्यूयॉर्कमध्ये त्याच्या 22 वर्षांच्या गर्लफ्रेण्डला किस करतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता. आता अनुराग वजन कमी करत असल्याची चर्चा आहे. मात्र ही कसरत सिनेमासाठी नाही तर गर्लफ्रेण्डसाठी आहे. शुभ्रा शेट्टी असं त्याच्या गर्लफ्रेण्डचं नाव आहे.

 

अनुरागला 20 किलो वजन कमी करायचंय...

सुत्रांच्या माहितीनुसार, मुंबईत परतल्यानंतर अनुराग आरामनगरमध्ये फिजीओला भेटला. ही जिम अनुरागच्या फॅण्टम फिल्म ऑफिसच्या जवळच आहे. 43 वर्षीय अनुरागला 20 किलो वजन कम करायचं आहे, जेणेकरुन तो फिट दिसेल. स्वत:पेक्षा 21 वर्षांने लहान असलेल्या गर्लफ्रेण्डसाठी अनुरागला वजन कमी करायचं आहे. काही वर्षांपूर्वी अनुरागचं कल्की कोचलिनसोबत घटस्फोट झाला होता.

 

कोण आहे शुभ्रा?

शुभ्रा मीडिया स्टुडंट आहे. 2014 मध्ये मुंबईच्या सेंट झेवियर कॉलेजमधून तिने शिक्षण पूर्ण केलं आहे. सध्या ती अनुरागच्या फॅण्टम फिल्म्स या प्रॉडक्शन कंपनीत काम करत आहे.

 

मागील वर्षी डिसेंबरमध्ये अफेअरची चर्चा

मागील वर्षी डिसेंबरमध्ये अनुराग आणि शुभ्राच्या अफेअरची चर्चा रंगली होती. अनेक कार्यक्रम आणि पार्ट्यांणध्ये अनुराग आणि शुभ्रा एकत्र दिसले होते. डिझायनर मसाबाच्या संगीत सोहळ्यातही शुभ्रा उपस्थित होती. स्वत: खुद अनुरागने हा फोटो शेअर करुन लिहिलं होतं की, “Hottie at the wedding”. या फोटोत त्याने शुभ्रालाही टॅग केलं होतं. यावरुन शुभ्रा आणि अनुराग रिलेशनशिपमध्ये असून दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची चर्चा होती.