Munjya Box Office Collection Day 20 :   मॅडॉक फिल्म्सची निर्मिती असलेला आणि आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) दिग्दर्शित 'मुंज्या' (Mujya) चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर 20 व्या दिवशीदेखील दबदबा कायम आहे. रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यात 'मुंज्या'ने प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे.  हा हॉरर कॉमेडी चित्रपट चांगलीच कमाई करत आहे. रिलीजचा पहिला आठवडा पूर्ण होण्याआधीच या चित्रपटाने त्याचे बजेट वसूल केले होते. आता या सुपरहिट चित्रपटाने चांगला नफा कमावला आहे. 


'मुंज्या'ने 20 व्या दिवशी किती कमाई केली?


हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुंज्या'ने बॉक्स ऑफिसवर आपली हुकूमत सिद्ध केली आहे. कमी बजेटच्या या चित्रपटाने आपल्या जबरदस्त कलेक्शनने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. 'मुंज्या' फक्त वीकेंडला बॉक्स ऑफिसवर  कमाई करत नसून आठवड्यातील इतर दिवशीही चांगली कमाई करत आहे. तिसऱ्या आठवड्यातही 'मुंज्या'चा फिव्हर प्रेक्षकांमध्ये जोरात सुरू असून, यासोबतच 'मुंज्या'च्या कलेक्शनमध्ये दररोज कोटींची वाढ होत आहे. 


'मुंज्या'ने  रिलीजच्या पहिल्या दिवशी 4 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात  35.3 कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या आठवड्यात 32.65 कोटींचा गल्ला जमवला. चित्रपटाने तिसऱ्या आठवड्याच्या तिसऱ्या शुक्रवारी 3 कोटी रुपये, तिसऱ्या शनिवारी 5.5 कोटी रुपये, तिसऱ्या रविवारी 6.85 कोटी रुपये, तिसऱ्या सोमवारी 2.25 कोटी रुपये आणि तिसऱ्या मंगळवारी 2.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता रिलीजच्या 20 व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या बुधवारी या चित्रपटाच्या कमाईचे प्राथमिक आकडे आले आहेत.


Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'मुंज्या' ने रिलीजच्या 20 व्या दिवशी 2.15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह 'मुंज्या'चे 20 दिवसांचे एकूण कलेक्शन 89.95 कोटी रुपये झाले आहे.


 ‘कल्कि 2898 एडी’ चा 'मुंज्या'ला फटका बसणार?


‘मुंज्या’च्या कमाईला आता ब्रेक लागण्याची शक्यता आहे. प्रभास-दीपिकाचा कल्की 2898 एडी हा 27 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची सध्या प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपटाचे बंपर ॲडव्हान्स बुकिंग झाले आहे. अशा परिस्थितीत गुरुवारी 'कल्की' रिलीज झाल्याने 'मुंज्या'च्या कमाईला मोठा धक्का बसू शकतो. नव्या रिलीजमुळे चित्रपटाचे शोही कमी होणार आहेत. अशा स्थितीत 'कल्की 2898 एडी' समोर 'मुंज्या' किती टिकाव धरू शकतो, हे पाहावं लागणार आहे.