मुख्तार सिद्दीकी शेख असं या मृत तरुणाचं नाव आहे. 30 वर्षीय मुख्तार बोरीवलीचा रहिवासी आहे. मुख्तार पेंटिंगचं काम करायचा. घटनेच्या दिवशी तो दहिसरहून भाईंदरला जात होता.
ही घटना महिनाभरापूर्वी घडल्याचं म्हटलं जात आहे. परंतु घटनास्थळावरील हा व्हिडीओ महिनाभरानंतर आता व्हायरल झाला आहे.
दहिसरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरही घटना घडली होती. दहिसर स्टेशनवर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये मुख्तार ट्रेनच्या समोर उडी मारताना स्पष्टपणे दिसत आहे. ट्रेन काही फुटांवर आल्यानंतर त्याने प्लॅटफॉर्मवरुन रुळावर उडी मारली. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
मात्र रेल्वे पोलिसांनी रुळ ओलांडताना मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. सध्या बोरीवली रेल्वे पोलिसांनी गुन्ह्याची नोंदवून तपास सुरु केला आहे.
पाहा व्हिडीओ