दिलीप कुमार यांना लीलावतीतून डिस्चार्ज, प्रकृतीत सुधारणा
एबीपी माझा वेब टीम | 09 Aug 2017 08:13 PM (IST)
दिलीप कुमार यांची किडनी वयोमानापरत्वे व्यवस्थित काम करत नव्हती. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयातून डिस्जार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्जनंतर कुटुंबीयांसोबत दिलीप कुमार घरी परतले. गेल्या आठवड्यात दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडली होती. डिहायड्रेशनच्या तक्रारीनंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं. दिलीप कुमार यांची किडनी वयोमानापरत्वे व्यवस्थित काम करत नव्हती. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.