ट्रेंडिंग
अलका कुबल यांच्याशी बोलणं होतं का? लक्ष्मीकांत बेर्डे यांचा स्वभाव कसा होता, उषा नाडकर्णी काय म्हणाल्या?
हिंदी सिनेसृष्टीत कौतुक करतात, आपल्या मराठीत जळकुटेपणा खूप आहे', उषा नाडकर्णी यांचं रोखठोक भाष्य
'सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या नाही तर त्याला मारलंय', उषा नाडकर्णी यांचे खळबळजनक दावे
नियॉन कलरची बिकनी का घातली? कियारा अडवाणीच्या बिकनी शूटबाबत मोठा खुलासा
धक्कादायक! सलमान खानच्या सुरक्षेत मोठी चूक, मध्यरात्री अज्ञात महिला थेट घुसली घरात, नेमकं काय घडलं?
Shriya Pilgaonkar : श्रिया पिळगावकरचा ग्लॅम लूक; सनकिस्ड फोटो होतायत व्हायरल!
आयटम साँग म्हणजे काय?: जरीन खान
Continues below advertisement
मुंबई: आयटम साँग काय आहे हे मला माहित नाही. किंवा याला असं नाव कुणी दिलं हे देखील माहित नाही. अशी प्रतिक्रिया बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री जरीन खान हिनं दिली आहे.
'कॅरेक्टर ढिला' आणि 'रेड्डी' यासारख्या गाण्यांमध्ये सुपरस्टार सलमानसोबत दिसलेली अभिनेत्री जरीन आता रामगोपाल दिग्दर्शित 'वीरप्पन' या सिनेमातील 'खल्लास वीरप्पन' या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.
'मी खल्लास हे गाणं यासाठी केलं कारण की, ते मला फारच आवडलं. मी खरंच खूप खुश आहे की, मला खल्लास गाणं करायला मिळालं. मला आयटम साँगचा अर्थही माहित नाही आणि या गाण्याला आयटम साँग का म्हणतात हे देखील मला माहित नाही.' असं जरीन म्हणाली.
'हेट स्टोरी 3'च्या अभिनेत्रीचं म्हणणं आहे की, 'अशा गाण्यांना प्रमोशनल किंवा स्पेशल गाणं म्हणायला हवं. कारण की असं गाणं ती व्यक्ती करते जी त्या सिनेमाचा भाग नसते.'
हेट स्टोरी 3 सिनेमामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री जरीन खान ही साई कबीरचा आगामी सिनेमा 'डिव्हाइन लव्हर्स' यामध्ये दिसून येणार आहे.
Continues below advertisement