मुंबई : 'चेन्नई एक्स्प्रेस' चित्रपटातील 'वन टू थ्री फोर' गाण्यातून प्रेक्षकांना भुरळ पाडणारी दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणीचा साखरपुडा झाला. बॉयफ्रेण्ड मुस्तफा राजसोबत प्रियामणी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.


 

 
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पारुथिवीरन या तामिळ चित्रपटासह दक्षिणेतील चारही भाषांमध्ये प्रियामणीने अभिनय केला आहे. ट्विटरवरुन प्रियामणीने आपल्या साखरपुड्याची माहिती दिली. 'सांगायला अत्यंत आनंद होत आहे की, शुक्रवारी 27 तारखेला माझी मुस्तफा राजसोबत छोटेखानी समारंभात एंगेजमेंट झाली.' असं तिने ट्विटरवर लिहिलं आहे.

 

 

https://twitter.com/priyamani6/status/736766434915667968

 
प्रियामणी आणि मुस्तफा यांची काही वर्षांपूर्वी आयपीएल दरम्यान भेट झाल्याचं म्हटलं जातं. मुस्तफा आयपीएलसाठी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीसाठी काम करतो. दोघं बंगळुरुमध्ये भेटले आणि डेटिंगनंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे.