मुंबई : ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर अखेर अनंतात विलीन झाले. शशी कपूर यांच्यावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. साश्रु नयनांनी आणि भारावलेल्या वातावरणात शशी कपूर यांना निरोप देण्यात आला.


शशी कपूर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकार सांताक्रूझमधील स्मशानभूमीत दाखल झाले होते. कपूर कुटुंबासह, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अभिषेक बच्चन, अनिल कपूर, संजय दत्त यांसारख्या कलाकार शशी कपूर यांच्या अंत्यविधीला उपस्थित होते.

चॉकलेट हिरो काळाच्या पडद्याआड, शशी कपूर यांचं निधन

बॉलिवूडचा चॉकलेट हिरो अशी ओळख असलेले शशी कपूर यांचं सोमवारी 4 डिसेंबर रोजी निधन झालं. वयाच्या 79 व्या वर्षी प्रदीर्घ आजारामुळे शशी कपूर यांनी कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

शशी कपूर यांच्या पश्चात कुणाल कपूर, संजना कपूर आणि करण कपूर असा परिवार आहे. एकूण 116 सिनेमांमध्ये काम करताना 61 सिनेमात शशी कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

दिवंगत अभिनेते शशी कपूर यांची कारकीर्द