देशातील टॉप अॅडव्हर्टायझिंग कंपनी 'लिंटास'ची स्थापना त्यांनी केली होती. हमारा बजाज, लिरील, सर्फ, चेरी ब्लॉसम शू पॉलिश यांसारख्या आकर्षक जाहिराती त्यांनी बनवल्या होत्या.
अॅलेक पदमसी यांना 2000 सालात पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी विल्यम शेक्सपिअरच्या 'मर्चंट ऑफ व्हेनिस' या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. त्यांचे बंधू बॉबी पदमसी यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं. यानंतर अॅलेक यांनीही अनेक नाटकांचं दिग्दर्शन केलं होतं.
अॅलेक पदमसी यांच्या निधानावर जाहिरात, चित्रपटसृष्टीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली आहे.