दीपिका आणि रणवीरने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेकांच्या नजरा तिच्या हातातील अंगठीवर खिळल्या. दीपिकाच्या डाव्या हाताच्या चारही बोटांमंध्ये चार अंगठ्या दिसत आहेत. परंतु सर्वांची नजर तिच्या 'एंगेजमेंट रिंग'कडेच गेली. त्यानंतर सर्वांनाच दीपिकाच्या या अंगठीबद्दल कुतूहल वाटू लागले आहे.
किती आहे अंगठीची किंमत?
रणवीरने दीपिकासाठी लग्नाच्या खूप आधीच ही स्पेशल अंगठी खरेदी केली होती. या अंगठीची किंमत 2 ते 2.7 कोटी रुपयांची असल्याचे बोलले जात आहे. रणवीरने दीपिकासाठी घेतलेली ही अंगठी सिंगल सॉलिटेअर स्केअर डायमंड रिंग या प्रकाराची आहे. अंगठीवर महागडे हिरे जडवलेले आहेत.
अंगठीने मोडले विक्रम
मागच्या वर्षी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाहबंधनात अडकले. विराटने अनुष्काला 1 कोटी रुपयांची हिऱ्यांची अंगठी घातली होती. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिचा बॉयफ्रेंड निक जोनासने 2 कोटी रुपयांची अंगठी दिली होती. तर अभिनेत्री सोनम कपूरला तिचा नवरा आनंद अहुजा याने 90 लाख रुपयांची अंगठी घातली होती.