Mahesh Manjrekar : मराठमोळे अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता नुकत्याच एका कार्यक्रमात मांजरेकरांनी मोठं वक्तव्य केलं आहे. "पोपटराव पवारांचं (Popatrao Pawar) काम मोठं आहे. पण क्रेडीट मात्र आमिर खानचं (Aamir Khan) पाणी फाऊंडेशन घेऊन जातं", असं वक्तव्य महेश मांजरेकरांनी केलं आहे.
पोपटराव पवार मोठं काम करतात, मात्र क्रेडिट आमिर खान घेऊन जातो : महेश मांजरेकर
'अस्वस्थ मनाच्या व्यथा' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) अहमदनगरला आले होते. त्यावेळी ते म्हणाले की,"पोपटराव पवार यांना भेटण्याची माझी खूप इच्छा होती. मला त्यांच्या गावीदेखील जायचं आहे. त्यांचं काम खूप मोठं आहे.
पोपटराव पवार यांना 'पद्मश्री' मिळाला याचा मला फार आनंद झाला नाही. खरंतर त्यांना 'पद्मभूषण' मिळायला हवा होता. पोपटराव पवार यांचं काम पद्मश्रीच्या पलीकडचे आहे. पोपटराव पवार हे खूप मोठं काम करतात मात्र क्रेडिट हे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आमिर खान घेऊन जातो".
"...तर कमी लोकांचा मृत्यू झाला असता"; कोरोना काळाबद्दल मांजरेकरांचं वक्तव्य
'अस्तवस्थ मनाच्या व्यथा' या बंडू पवार लिखित पुस्तकात कोरोना काळातील काही गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. याबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले की,"कोरोना व्हायरल आपल्याकच आहे तो कुठेही गेलेला नाही. दरम्यान आपण सर्वांनी जी व्हॅक्सीन घेतली त्या व्हॅक्सीनने काहीही झालेलं नाही. उलट त्रासच जास्त झाला आहे. तुम्हालाही ते हळूहळू कळेल. कोरोना काळात थोडीशी जास्त काळजी घेतली असती तर कमी लोकांचं निधन झालं असतं".
पोपटराव पवार कोण आहे? (Who Is Popatrao Pawar)
पोपटराव पवार हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. 1972 मध्ये महाराष्ट्राला मोठ्या दुष्काळाला सामोरं जावं लागलं होतं. त्याच दुष्काळात हिवरे बाजार गावाला देखील याचा फटका बसला. शेती आणि पूरक व्यवसायांवर अवलंबून असलेल्या हिरवे बाजारचे हाल होऊ लागले. गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
1989 साली पोपटराव पवार हे गावाचे सरपंच झाले. पोपटराव पवार हे गावातील एकमेव पदव्युत्तर शिक्षण झालेले नागरिक होते. त्यांनी गावात लोकोपयोगी कामे केली. त्यांच्या कामामुळे गावाचं रूप पालटू लागलं. दुष्काळी भागात पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलसंधारणाचे नियोजन त्यांनी केले.
संबंधित बातम्या