Mrunal Thakur On Freezing Eggs :  अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) आज बॉलिवूडच नव्हे तर टॉलीवूडमध्येही तिने ओळख निर्माण केली आहे. मृणालने नुकतेच इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये रडत असल्याचा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोबाबत मृणालने स्पष्टीकरण दिले आहे. मृणालने सांगितले की, काही विशिष्ट दिवस तिला तिच्या अंथरुणातून उठायचे नव्हते. मृणालने हे देखील सांगितले की, तिला अनेकदा बॉडी शेमिंगचा सामना करावा लागतो. सौंदर्याची मानके बदलण्याचा प्रयत्न करणार  असल्याचेही तिने सांगितले. यापुढेही जात मृणालने गर्भाशयाची अंडी गोठवण्याबाबत भाष्य केले. 


कुटुंबाशिवाय कोणालाच काळजी नाही


'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या मुलाखतीत मृणालने किती लोक ऑनलाइन आदर्श जीवन जगण्याचे नाटक करतात हे सांगितले. तिने सांगितले की, “असे दिवस होते जेव्हा मला उठायचे नव्हते, मला माझ्या बिछान्यातून उठायचे नव्हते, पण मी इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी उठले. मला एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस, आठवडा, महिनाभर उदास वाटत आहे, परंतु आपल्या कुटुंबाशिवाय इतर कोणीही काळजी घेत नाही. म्हणून मला वाटते की जर वाईट दिवस असतील तर चांगले दिवसही येतील.






सुंदरतेची व्याख्या बदलायची आहे... 


मृणालने बॉडी पॉझिटिव्हिटीबद्दलही उघडपणे भाष्य केले. तिने सांगितले की, शरीराच्या विशिष्ट आकाराबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया मिळतात.  मी आता माझी बॉडी कर्व्सला दाखवून सुंदरतेची व्याख्या बदलणार आहे. याआधी मला भीती वाटाचयी. पण, आता मला त्याचे काही वाटत नाही. स्त्री सौंदर्याची मानके ठरवण्यासाठी आपल्याला कार्दशियनची आवश्यकता क आहे? रस्त्यावर चालणारी प्रत्येक भारतीय महिला जी सुडौल आहे, ती सुंदर असल्याचे मत मृणालने व्यक्त केले. 






मृणाल ठाकूर करणार एग्ज फ्रीझ


मृणालने नातेसंबंधांबद्दल भाष्य केले. अभिनेत्री मोना सिंगने गर्भाशयाची अंडी गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा उल्लेख करताना तिने सांगितले की, रिलेशनशिप , मला माहीत आहे की ते कठीण आहे. परंतु म्हणूनच तुम्हाला तुमच्या कामाचे स्वरूप समजणारा योग्य जोडीदार हवा आहे. त्याने तुम्हाला समजून घेतले पाहिजे. मी देखील गर्भाशयाची अंडी गोठवण्याबाबत विचार करत असल्याचे तिने सांगितले.