Movie Release This Week : सिनेरसिक चांगल्या सिनेमांची नेहमीच प्रतीक्षा करत असतात. येत्या शुक्रवारी अनेक बिग बजेट सिनेमे (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात प्रेक्षकांना थरार, नाट्य, बायोपिक, अॅक्शन, भयपट अशा अनेक प्रकारचे सिनेमे पाहायला मिळणार आहेत.
सिनेमाचे नाव : विक्रांत रोना (Vikrant Rona)
कधी होणार रिलीज : 28 जुलै
कुठे होणार रिलीज : सिनेमागृह
दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीपचा 'विक्रांत रोना' हा सिनेमा 28 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. अनूप भंडारीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात किच्चा सुदीपसोबत जॅकलीन फर्नांडिजदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.
सिनेमाचे नाव : एक विलेन रिटर्न्स (Ek Villain Returns)
कधी होणार रिलीज : 29 जुलै
कुठे होणार रिलीज : सिनेमागृह
'एक विलेन' या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता या सिनेमाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'एक विलेन रिटर्न्स' असे या सिनेमाचे नाव आहे. हा रहस्यमय सिनेमा असून या सिनेमात अर्जुन कपूर, जॉन अब्राहम, दिशा पटानी आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहेत.
सिनेमाचे नाव : टाइमपास 3
कधी होणार रिलीज : 29 जुलै
कुठे होणार रिलीज : सिनेमागृह
'टाइमपास 3' या मराठी सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या सिनेमात हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परब मुख्य भूमिकेत आहेत. 'टाइमपास 3' या सिनेमाचे दिग्दर्शन रवी जाधवने केलं आहे. या सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून आता प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
सिनेमाचे नाव : रॉकेट्री
कधी होणार रिलीज : 26 जुलै
कुठे होणार रिलीज : अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ
आर माधवनच्या 'रॉकेट्री' या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. आता हा सिनेमा अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ प्रदर्शित होणार आहे. नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे.
सिनेमाचे नाव : द बॅटमॅन
कधी होणार रिलीज : 27 जुलै
कुठे होणार रिलीज : अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ
रॉबर्ट पॅटिनसनचा 'द बॅटमॅन' हा सिनेमा आता अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा आता इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळण आणि कन्नड भाषेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
सिनेमाचे नाव : 777 चार्ली
कधी होणार रिलीज : 29 जुलै
कुठे होणार रिलीज : वूट
'777 चार्ली' हा सिनेमा 29 जुलैला वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. '777 चार्ली' या सिनेमात रक्षित शेट्टी प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमात एका व्यक्तीचे श्वानासोबत असणारे नाते दाखवण्यात आले आहे.
संबंधित बातम्या