Movie Release This Week : सिनेरसिक चांगल्या सिनेमांची नेहमीच प्रतीक्षा करत असतात. येत्या शुक्रवारी अनेक बिग बजेट सिनेमे (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात प्रेक्षकांना थरार, नाट्य, बायोपिक, अॅक्शन, भयपट अशा अनेक प्रकारचे सिनेमे पाहायला मिळणार आहेत. तर अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे या आठवड्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
सिनेमाचे नाव : भोला (Bholaa)
कधी होणार रिलीज : 15 जुलै
कुठे होणार रिलीज : सिनेमागृह
अजय देवगणचा बहुचर्चित 'भोला' हा सिनेमा 15 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात काम करण्यासोबत दिग्दर्शनाची धुरादेखील अजयनेच सांभाळली आहे. त्यामुळे या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत. या सिनेमात अजयसोबत तब्बूदेखील झळकणार आहे. हा सिनेमा 2019 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'कैथी' या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.
सिनेमाचं नाव : दसरा (Dasara)
कधी होणार रिलीज : 31 मार्च
कुठे होणार रिलीज? सिनेमागृह
गेल्या काही दिवसांत दाक्षिणात्य सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. आता दाक्षिणात्य सुपरस्टार नानीचा (Nani) 'दसरा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. श्रीकांत ओडेलाने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात नानीसह साई कुमार, समथिरकानी, दीक्षित शेट्टी, संतोष नारायणन आणि जरीना वहाब हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत, हा सिनेमा येत्या 30 मार्चला तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी या भाषांमध्ये रिलीज होणार आहे.
सिनेमाचं नाव : गॅसलाईट (Gaslight)
कधी होणार रिलीज? 31 मार्च
कुठे होणार रिलीज? डिज्नी प्लस हॉटस्टार
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा 'गॅसलाईट' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात सारासह विक्रांत मेस्सीदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात प्रेक्षकांना सस्पेन्स, थ्रील, नाट्य, थरार अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतील असे म्हटले जात आहे.
सिनेमाचं नाव : विदुथलई पार्ट 1 (Viduthalai Part 1)
कधी होणार रिलीज? 31 मार्च
कुठे होणार रिलीज? सिनेमागृह
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीचा (Vijay Sethupathi) 'विदुथलई पार्ट 1' हा सिनेमा येत्या शुक्रवारी म्हणजेच 31 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या हा सिनेमा तामिळ भाषेत प्रदर्शित होणार असून लवकरच हिंदीतदेखील प्रदर्शित करण्यात येणार आहे. जर हा सिनेमा हिंदीत प्रदर्शित झाला तर अजय देवगणला मोठा फटका बसू शकतो. वेट्री मारनने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
संबंधित बातम्या