Saptapadi Mantra Meaning : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. 27 जानेवारी 2022 रोजी गोव्यात मौनी आणि सूरज नांबियार (Suraj Nambiar) यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. मौनीने आता लग्नसोहळ्यातले फोटो शेअर करत सप्तपदी मंत्र लिहिला आहे.


मौनी रॉयने 'हा' सप्तपदी मंत्र इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे
सखायौ सप्तपदा बभूव ।
सख्यं ते गमेयम् ।
सख्यात् ते मायोषम् ।
सख्यान्मे मयोष्ठाः ।


ज्योतिषांच्या मते, या मंत्राचा अर्थ असा आहे की,'तू माझ्यासोबत सात फेरे घेतले आहेस. त्यामुळे माझा स्वीकार कर'. मौनीचा लग्नातला लूक दाक्षिणात्य होता. तिने लग्नात पांढऱ्या आणि लाल रंगाची साडी, सोनेरी रंगाचे दागिने आणि केसांमध्ये गजरा माळला होता. तर सूरजने सोनेरी रंगाचा कुर्ता परिधान केला होता.





2019 मध्ये मौनी आणि सूरज दुबईत एका पार्टीत भेटले होते. पहिल्याच भेटीत सूरज नांबियार मौनी रॉयच्या प्रेमात पडला होता. सूरजची आई रेणुका आणि वडील राजा यांच्याशीही मौनीचे चांगले संबंध आहेत.


संबंधित बातम्या


Bigg Boss 15 Finale : रश्मी देसाई बिग बॉसमधून आऊट, रविवारी होणार महाअंतिम सोहळा


Amol Kolhe : 'नथुराम'ची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे गांधींच्या चरणी; आत्मक्लेश करत व्यक्त केली दिलगिरी


Raj Kundra : राज कुंद्राची इन्स्टाग्रामवर 'घर वापसी'; 'या' नावाने उघडलं अकाऊंट


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha