Mouni Roy Suraj Wedding : 'नागिन' फेम अभिनेत्री मौनी रॉयच्या (Mouni Roy) हाताला सूरज नांबियारच्या नावाची मेहंदी लागली आहे. 27 जानेवारीला मौनी सूरज नांबियारसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांचे गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे. सध्या त्यांच्या  प्री-वेडिंगचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


फोटो आणि व्हिडीओमध्ये मौनी आनंदात दिसत आहे. त्यांच्या प्री-वेडिंगचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत. 2019 मध्ये मौनी सूरजला पहिल्यांदा दुबईत एका पार्टीमध्ये भेटली होती. दोघांच्या लग्नाला इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. मात्र, अद्याप पाहुण्यांची यादी समोर आलेली नाही.






मौनीचा खास मित्र अर्जुन बिजलानीने मेहंदीसोहळ्यात मौनीच्या आईसोबत मेहंदी लगा के रखना या गाण्यावर डान्सदेखील केला आहे.  मौनी लवकरच रणबीर कपूर, आलिया भट्टसह 'ब्रह्मास्त्र' सिनेमात दिसणार आहे.


संबंधित बातम्या


Bahubali: Before The Beginning : नेटफ्लिक्सचा बिग बजेट 'बाहुबली: बिफोर द बिगिनिंग' नव्याने करण्याचा निर्णय, 150 कोटींचा फटका


सुंदर पिचाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर नेमकं काय म्हणाले दिग्दर्शक सुनील दर्शन


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha