Raj Thackeray: मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरला (Amruta Khanvilkar) नुकतीच दिवाळीनिमित्त एक खास भेटवस्तू मिळाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Letter) यांच्याकडून आणि त्यांच्या कुटुंबियांकडून अमृता खानविलकरला खास गिफ्ट देण्यात आलं आहे. या गिफ्टचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन अमृतानं राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाचे आभार मानले आहेत.
अमृतानं शेअर केला व्हिडीओ
अमृता खानविलकरनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिला राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबानं पाठवलेले गिफ्ट दिसत आहे. यामध्ये विविध वस्तू आहेत, तसेच या गिफ्टवर "दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा", असं लिहिलेलं दिसत आहे. अमृतानं या गिफ्टचा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "राज ठाकरे, शर्मिला ठाकरे वहिनी, मिताली ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे मनापासून धन्यवाद"
साडे माडे तीन,चोरीचा मामला,कट्यार काळजात घुसली या चित्रपटांमध्ये अमृतानं काम केलं. तसेच तिनं मलंग आणि राझी या हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. अमृताच्या चंद्रमुखी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटामुळे अमृताला विशेष ओळख मिळाली.अमृता ही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देत असते.
काल मनसेकडून (MNS) दिपोत्सव आयोजित करण्यात आला. मनसेच्या दीपोत्सवाचे यंदाचे 11 वर्ष आहे. यंदाच्या दीपोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले. या दिपोत्सवाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) जावेद अख्तर (Javed Akhtar)आणि सलीम खान (Salim Khan) यांनी मनसेच्या या दिपोत्सवात हजेरी लावली. यावेळी रितेशनं जावेद अख्तर आणि सलीम खान यांची मुलाखत देखील घेतली. यावेळी विविध विषयांवर जावेद अख्तर आणि सलीम खान यांनी चर्चा केली.
मनसेच्या वतीने दरवर्षी दिवाळीत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. शिवाजी पार्कवर होणाऱ्या दीपोत्सवाची मनसैनिक आतुरतेने वाट पाहत असतात. सलीम-जावेद (Salim-Jawad) यांच्या शुभहस्ते 'दिपोत्सव 2023'चं उद्धाटन झाले. सलीम-जावेद यांनी 1970 मध्ये भारतीय सिनेसृष्टीत क्रांती घडवून आणली आहे. बॉलिवूडपट ब्लॉकबस्टर करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. बॉलिवूडमधील ही लोकप्रिय पटकथालेखन करणारी जोडी आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: