मुंबई : ‘पद्मावत’ चित्रपटाला देशभरात अनेक राज्यांमध्ये राजपूत करणी सेनेने विरोध केला असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेना चित्रपटाच्या बाजूने उभी आहे. आवश्यकता भासल्यास मुंबईसह महाराष्ट्रात ‘पद्मावत’ प्रदर्शित होण्यासाठी मनसे सज्ज असेल, असं महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.


संजय लीला भन्साळी दिग्दर्शित‘पद्मावत’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला सेन्सॉर बोर्ड आणि सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. असं असतानाही करणी सेनेने त्याला विरोध करणं चुकीचं आहे, असं मतही मनसने व्यक्त केलं आहे.

करणी सेनेकडून तोडफोड

पद्मावत चित्रपटाचे पेड प्रीव्ह्यू देशभरात अनेक ठिकाणी प्रदर्शित होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर करणी सेनेने धुमाकूळ घातला आहे. अहमदाबादमध्ये करणी सेनेच्या जवळपास तीन हजार कार्यकर्त्यांनी तीन मॉलमध्ये तोडफोड केली. मॉलबाहेर पार्क केलेल्या 40 बाईक्सना आग लावली, तर काही गाड्यांची तोडफोडही केली.

कँडल मार्चच्या नावाखाली करणी सेनेचे कार्यकर्ते जमा झाले, मात्र अचानक जमाव हिंसक झाला. पोलिसांना आक्रमक कार्यकर्त्यांवर ताबा मिळवण्यास वेळ लागला. अखेर, पोलिसांनी 16 कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

पद्मावतचा पेड प्रीव्ह्यू

'पद्मावत' हा चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होणार आहे, मात्र निर्मात्यांनी एक दिवस आधीच म्हणजे 24 तारखेला पेड प्रीव्ह्यू आयोजित केला आहे. शुल्क भरुन कोणीही हा चित्रपट पाहू शकतं. सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी निर्मात्यांनी ही शक्कल लढवल्याचं म्हटलं जात आहे.

'पद्मावत'चा वाद काय?

राजपूत करणी सेना आणि काही राजकीय पक्षांनी विरोध केल्याने 'पद्मावती' संदर्भात वाद निर्माण झाला होता. राजपुतांच्या राणीचं चुकीचं चित्रण केल्याचा आरोप करत करणी सेनेने सिनेमाला विरोध केला आहे.

हा सिनेमा अंशतः ऐतिहासिक घटनांवर आधारित असल्याचं सिनेकर्त्यांनी सांगितल्यामुळे केंद्रीय चित्रपट निरीक्षक मंडळाने इतिहासतज्ज्ञ आणि राजघराण्यातील काही व्यक्तींना पद्मावती पाहण्यासाठी निमंत्रित केलं होतं. निर्मात्यांनी 'पद्मावती अंशतः ऐतिहासिक घटनांवर आधारित' असल्याचं सांगून संकट ओढावून घेतल्याचं सेन्सॉर बोर्डाने म्हटलं होतं.

'पद्मावती काल्पनिक आहे की ऐतिहासिक घटनांवर आधारित' यासंबंधी विचारणा करणारा फॉर्ममधील भाग रिकामा ठेवल्यामुळे सेन्सॉर बोर्डाने सिनेमाची कॉपी निर्मात्यांना परत पाठवली होती.

पद्मावती ते पद्मावत

पद्मावती चित्रपटाला सर्टिफिकेट हवं असल्याचं त्याचं नामकरण 'पद्मावत' करावं अशी सूचना केंद्रीय चित्रपट निरीक्षण मंडळातर्फे देण्यात आली होती. हा चित्रपट ऐतिहासिक नसून, पद्मावत ही काल्पनिक कलाकृती या चित्रपटाच्या सर्जनशीलतेचा स्रोत असल्याचं दिग्दर्शकाने म्हटलं आहे. म्हणून भन्साळींना सिनेमाचं नावही पद्मावत ठेवण्यास सांगितल्याचं सेंसॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी म्हणाले होते.

सतीच्या परंपरेचं कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही, असंही डिस्क्लेमर देण्यास दिग्दर्शकाला सांगण्यात आलं होतं.

चित्रपटाचं नाव बदलून 'पद्मावत' आणि काही दृश्यांत बदल केल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने यू/ए सर्टिफिकेट दिलं. 'Padmavati' पासून सुरु झालेला या टायटलचा प्रवास व्हाया 'Padmavat' आता 'Padmaavat' वर पोहचला आहे.

घूमरचं नवं व्हर्जन

दीपिकाच्या ‘घूमर’ गाण्याचंही नवं व्हर्जन रिलीज करण्यात आलं आहे. आधी या गाण्यात दीपिकाची कंबर दिसत होती. मात्र सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या बदलांनंतर नव्या गाण्यात दीपिकाची कंबर झाकण्यात आली आहे. शिवाय यूट्यूबवरुनही जुनं गाणं हटवण्यात आलं आहे. गाण्यात ज्या ठिकाणी दीपिकाची कंबर दिसत आहे, ते कम्युटर ग्राफिक्सच्या माध्यमातून लपवलं आहे.

चार राज्यांचा विरोध

राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा या चार राज्यांनी सिनेमाच्या रीलिजवर बंदी घातली. याविरोधात निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यावर कोर्टाने ही बंदी अवैध असल्याचं सांगितलं. 'पद्मावत' प्रदर्शित झाल्यावर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही राज्य सरकारची जबाबदारी असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.

'पद्मावती' 1 डिसेंबर 2017 रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी महिनाभर आधी हे रिलीज अनिश्चित काळासाठी पुढे ढकललं. अखेर 25 जानेवारी 2018 रोजी हा चित्रपट 'पद्मावत' नावाने प्रदर्शित होणार आहे.

दीपिका, शाहिद आणि रणवीर प्रमुख भूमिकेत

राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदुकोन असून शाहिद कपूरने राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीची व्यक्तिरेखा साकारली आहे. पद्मावत चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे.

रणवीर सिंह पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.

संबंधित बातम्या


'पद्मावत' देशभरात रिलीज होणार!


‘पद्मावत’च्या रिलीजआधी दीपिका सिद्धिविनायकाच्या चरणी


योगींची मध्यस्थी, करणी सेना 'पद्मावत' पाहण्यास तयार


'पद्मावत' चित्रपटातील आणखी चार गाणी रिलीज


'पद्मावत'ला करणी सेनेचा विरोध कायम, 25 जानेवारीला 'भारत बंद'ची हाक


'घूमर' गाणं नव्याने रिलीज, दीपिकाची कंबर झाकून गाण्याचं नवं व्हर्जन


'पद्मावत' सिनेमा निरर्थक, अजिबात पाहू नका : ओवेसी


'पद्मावत'च्या निर्मात्यांना दिलासा, सर्व राज्यात प्रदर्शित होणार!


चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’वर बंदी, निर्माते सुप्रीम कोर्टात


केजीतील विद्यार्थ्याचा घूमर डान्स, करणी सेनेकडून शाळेत तोडफोड


‘पद्मावत’ची अधिकृत रिलीज डेट अखेर जाहीर


अखेर मोठ्या वादानंतर ‘पद्मावत’ सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज


'घूमर'मध्ये दीपिकाची कंबर दिसणार नाही, बोर्डाच्या सूचनेनंतर बदल


'पद्मावत'मध्ये 300 कट्स नाहीत, प्रसून जोशींकडून वृत्ताचा इन्कार


म्हणून 'पद्मावती'चं नाव 'पद्मावत' करण्याची सूचना : प्रसून जोशी


‘पद्मावती’चा विरोध तीव्र, भन्साळींच्या घरासमोर आंदोलन


… तर पद्मावती रिलीज होऊ देणार नाही, यूपीचे उपमुख्यमंत्रीही विरोधात


‘पद्मावती’च्या मीडिया स्क्रीनिंगवरुन सेन्सॉर बोर्ड नाराज


सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावती’ सिनेमाची कॉपी परत पाठवली


‘पद्मावती’पेक्षा राजस्थानातील महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या : शशी थरुर


रिलीजआधी ‘पद्मावती’चा विक्रम; ‘बाहुबली’, ‘दंगल’ला मागे टाकलं