अलाहाबाद : बॉलिवूड अभिनेत्री मुग्धा गोडसे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. बॉयफ्रेंड राहुल देवसोबत तिचा विवाह होणार आहे. येत्या काही महिन्यातच आपलं लग्न होणार असल्याचे संकेत खुद्द मुग्धाने दिले आहेत.
अभिनेता राहुल देव याच्या पहिल्या पत्नीचं आठ वर्षापूर्वीच निधन झालं होतं. त्यानंतर तो आता पुन्हा बोहल्यावर चढणार आहे. राहुलने बॉलिवूडमध्ये अनेक हिंदी सिनेमात खलनायकाच्या भूमिका साकरल्या आहेत. राहुल आणि मुग्धा गेल्या अनेक वर्षापासून रिलेशनशीपमध्ये होते. त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
अलाहाबादमध्ये एका रेस्टॉरंटच्या उद्घाटनासाठी आलेल्या मुग्धाने यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. त्याचवेळी तिने आपल्या लग्नाचीही बातमी दिली.
मुग्धा सध्या दोन हिंदी सिनेमांमध्ये काम करत असून तिचा एक सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. तर दुसऱ्या सिनेमाचं सध्या शुटींग सुरु आहे. मुग्धाने आतापर्यंत फॅशन, ऑल द बेस्ट, हिरोईन, गँगस्टर रिटर्नस, जेल यासारख्या बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं आहे.