मुंबई : करण जोहर दिग्दर्शित 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमाच्या प्रदर्शनावरचं विघ्न अखेर दूर झालं आहे. मनसेने या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी उगारलेलं विरोधास्त्र अखेर आज म्यान केलं.
दिग्दर्शक करण जोहर आणि मुकेश भट्ट यांनी दिलेल्या ठोस आश्वासनांमुळे ही माघार घेतल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. यापुढे कोणत्याही पाकिस्तानी कलाकार, तंत्रज्ञाला सिनेमात घेऊ नका, सैन्य कल्याणनिधीत प्रत्येकी पाच-पाच कोटी रुपये द्या, सिनेमा सुरु होण्याआधी शहीदांना श्रद्धांजलीची फलक दाखवा, अशा अटी निर्माते आणि दिग्दर्शकांनी मान्य केल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या वादात मध्यस्थी करत राज ठाकरे आणि निर्माते-दिग्दर्शक करण जोहर यांना वर्षा बंगल्यावर बोलावलं होतं. तासभर चाललेल्या या बैठकीत हा तोडगा काढला गेला.
उरीच्या दहशतवादी हल्ल्यांनंतर पाकिस्तानी कलाकार आणि त्यांनी भूमिका केलेले सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका मनसेनं घेतली होती. त्यावरुन हा वाद उभा राहिला होता.
‘ऐ दिल है मुश्किल’चा वाद काय आहे?
‘ऐ दिल है मुश्किल’ या करण जोहरच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याची भूमिका आहे. पाकिस्तानी कलाकारांना आपल्या सिनेमात घेऊ नये, यासाठी मनसेने आवाज उठवला होता. त्यानंतर फवाद खान आणि इतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडला. मात्र, करण जोहरच्या सिनेमात फवादची भूमिका असल्याने तो वादात सापडला.
संबंधित बातम्या :
'ऐ दिल है मुश्किल'चा तिढा सुटला, सिनेमा रिलीज होणार
‘ऐ दिल..’बाबत रणनीतीसाठी मनसेची कृष्णकुंजवर खलबतं
मनसेच्या आंदोलनांवर अभिनेत्री रेणुका शहाणेंची फेसबुक पोस्ट
मनसे गुंडांचा पक्ष, केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियोंचा हल्लाबोल
‘ऐ दिल..’च्या प्रदर्शनासाठी करण जोहर राजनाथ यांच्या दारी
मनसेचे मल्टिप्लेक्समधील कामगारही पाक कलाकारांविरोधात
माजी क्रिकेटर संजय मांजरेकरची मनसेवर बोचरी टीका
यापुढे पाक कलाकारांना सिनेमात घेणार नाही : करण जोहर
मोदींकडून माफीची मागणी केलीच नव्हतीः अनुराग कश्यप
पाकिस्तानी कलाकारांबाबत मुकेश अंबानी म्हणतात…
पाक कलाकारांबाबत आमीरची पत्नी म्हणते…
‘ऐ दिल..’ प्रदर्शित केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा
मोदीजी, पाकिस्तान दौऱ्याबाबत माफी कधी मागताय? : अनुराग कश्यप
भारत-पाक संबंधांवरुन फिल्मस्टारच टार्गेट का? : प्रियंका
माहिरा खानची ‘रईस’मध्ये रिप्लेसमेंट नाही, निर्मात्याचे संकेत
‘ऐ दिल..’मध्ये फवादच्या चेहऱ्यावर ‘या’ हिरोचा मुखवटा
पाक कलाकार असलेले चित्रपट दाखवणार नाही, सिंगल स्क्रीन थिएटर मालकांचा निर्णय