मुंबई : बॉलिवूडचे सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिलाय. मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय उर्फ मिमोह आणि पत्नी योगिता बाली यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामिन अर्ज हायकोर्टानं फेटाळून लावला आहे.
मायलेकाविरोधात बलात्कार, फसवणूक आणि गर्भपात करण्याची सक्ती केल्याचा आरोप एका महिलेकडून करण्यात आला आहे. या दोघांवरही गुन्हा दाखल केलाय. याच संदर्भात अटकपूर्व जामिन अर्ज करण्यात आला होता. या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर झाली. तसेच दिल्लीतील कोर्टाचे आदेश असल्यानं ही याचिका इथं उभी रहात नसल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलंय.
हिंदी आणि भोजपुरी चित्रपटातील अभिनेत्रीने योगिता आणि महाअक्षय विरोधात तक्रार केली होती. लग्नाच्या आमिषाने महाअक्षयने शारीरिक संबंध ठेवल्याचा दावा या तक्रारीत केला आहे.
महाअक्षय उर्फ मिमोहने 2008 साली 'जिमी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर हाँटेड, लूट यासारख्या काही चित्रपटांमध्ये तो झळकला होता.
मिथुन चक्रवर्तींच्या कुटुंबियांचा अटकपूर्व जामिन अर्ज हायकोर्टानं फेटाळला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Jul 2018 04:11 PM (IST)
मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय उर्फ मिमोह आणि पत्नी योगिता बाली यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामिन अर्ज हायकोर्टानं फेटाळून लावला आहे

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -