कॅन्सरग्रस्त सोनालीला भेटण्यासाठी हा अभिनेता सर्वात आधी न्यूयॉर्कमध्ये!
एबीपी माझा वेब टीम | 05 Jul 2018 11:19 AM (IST)
सोनालीला हाय ग्रेड कॅन्सर झाला असून सध्या ती अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेला हाय ग्रेड कॅन्सर झाला असून तिच्यावर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु आहे. कॅन्सर झाल्याची माहिती स्वत: सोनालीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली. कॅन्सरग्रस्त सोनालीची विचारपूस करण्यासाठी अभिनेता अक्षय कुमार सर्वात आधी न्यूयॉर्कला पोहोचला. अक्षय आणि सोनालीने 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा' या सिनेमात एकत्र काम केलं होतं. अक्षयला सोनालीच्या आजारपणाविषयी माहिती मिळताच, तो तिला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचला. या वृत्ताला दुजोरा देताना अक्षय म्हणाला की, "मला माहित आहे, सोनाली एक फायटर आहे. ईश्वर तिची प्रकृती सुधारण्यात मदत करो." सोनालीला हाय ग्रेड कॅन्सर झाला असून सध्या ती अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये आहे. तिथल्या स्लोन कॅटरिंग कॅसर सेंटरमध्ये तिच्यावर उपचार सुरु आहेत. सोनालीसोबत तिचा मुलगा रणवीर बहल आहे. सोनालीचं लग्न 2002 मध्ये झालं होतं, तर 2005 मध्ये रणवीरचा जन्म झाला होता.