Miss Universe 2021 Harnaaz Sandhu : बॉलिवूड आणि पंजाबी सिनेसृष्टीतील अभिनेत्री उपासना सिंह आणि विश्वसुंदरीचा किताब जिंकणारी हरनाज संधूचे (Harnaaz Sandhu) खास नाते आहे. उपासना हरनाजला वैयक्तिकरित्या ओळखते. उपासनाने हरनाज संधूने विश्वसुंदरीचा किताब मिळवल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे. 


उपासना म्हणते,"विश्वसुंदरीचा किताब जिंकल्यानंतर हरनाजने मला इस्रायलमधून फोन केला. हा किताब मिळाल्याने तिला खूप आनंद झाला आहे. 21 वर्षांनंतर तिने मिस युनिवर्सचा किताब जिंकला आहे. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे". 


उपासना पुढे म्हणाली,इस्रायलमधील स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी हरनाजने मला स्वादिष्ट राजमा आणि भात खायला दिला होता. स्पर्धेबाबत तिच्यात आत्मविश्वासही होता. या आत्मविश्वासामुळेच तिने हे यश संपादन केले आहे. मला हरनाजचा खूप अभिमान आहे.





कोण आहे हरनाझ संधू?
हरनाझ संधू चंदीगडची राहणारी असून ती पेशाने मॉडेल आहे. तिने पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. हरनाझ 'यारा दियां पू बारां' आणि 'बाई जी कुट्टांगे' या पंजाबी चित्रपटात झळकली आहे. तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेत विजय मिळवला आहे. त्याशिवाय ती अभ्यासातही हुशार आहे. तिचे पदवी शिक्षण पूर्ण झाले असून सध्या ती सध्या पदव्यूतर शिक्षण पूर्ण करत आहे. तिला घोडेस्वारी आणि पोहण्याची आवड आहे.


संबंधित बातम्या


Miss Universe Harnaaz Sandhu : 21 वर्षांनंतर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा, किताब जिंकल्यानंतर मिस युनिवर्स हरनाझ संधू म्हणाली...


Miss universe 2021 : भारताची हरनाज संधू बनली विश्वसुंदरी, पटकावला 'मिस युनिवर्स'चा किताब


Miss Universe 2021 : विश्वसुंदरी हरनाज संधू आधी 'या' भारतीय सुंदरीनी पटकावलाय किताब


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha