Mere Husband Ki Biwi Movie Trailer : अभिनेता अर्जून कपूर, अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंह यांच्या आगामी चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट फुलऑन इंटरटेंमेंट असेल, असं ट्रेलर पाहिल्यालर लक्षात आलं आहे, त्यामुळे या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'मेरे हसबंड की बीवी' या आगामी चित्रपटातचा ट्रेलर 1 फेब्रुवारीला रिली करण्यात आला आहे. मुंबईत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच धमाकेदारा कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती.
'मेरे हसबंड की बीवी' फुल ऑन एन्टरटेनिंग ट्रेलर रिलीज
अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि रकुल प्रित सिंह यांच्या 'मेरे हसबंड की बीवी' या कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटातील कलाकारांचा अभिनय दमदार दिसत असून कथा देखील हास्याने भरलेली आहे. दोन महिलांमध्ये अडकलेल्या अर्जुन कपूरच्या प्रवासाबद्दल तुम्हालाही दया येईल.
दोन बायकांच्या प्रेमात पुरता अडकला अर्जून
'मेरे हसबंड की बीवी' या चित्रपटाची निर्मिती पूजा फिल्म्सने केली आहे. पूजा फिल्म्सने आता चित्रपटाचा मजेदार ट्रेलर शेअर केलं आहे. त्यांनी इंस्टाग्मावर ट्रेलर शेअर करताना लिहिलंय, "या सीझनमधील सर्वात मोठ्या वेडेपणासाठी सज्ज व्हा, क्यूकी ये लव्ह ट्रँगल नाही, फुल सर्कल है! मेरे हसबंड की बीवी चित्रपटाचा ट्रेलर आता प्रदर्शित झाला आहे".
प्रेक्षक अर्जूनला नव्या भूमिकेत पाहण्यास उत्सुक
अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंह लवकरच 'मेरे हसबंड की बीवी' या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि या चित्रपटाची एक खास झलक पाहायला मिळाली आहे. अर्जुन कपूरने अलीकडेच 'सिंघम अगेन' या चित्रपटातून पुनरागमन केलं आहे आणि त्याचे चाहते आता त्याला एका कॉमेडी चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
कोण होणार अर्जुनच पत्नी?
चित्रपटाचा ट्रेलर कॉमेडी आणि रोमान्सने भरलेला आहे. ट्रेलरमध्ये भूमीला एक्स वाईफच्या भूमिकेत दाखवण्यात आलं आहे, तर रकुलला होणारी पत्नी म्हणून दाखवण्यात आलं आहे आणि या दोघांमध्ये, अभिनेता अर्जुन कपूर कैचीत सापडलेला दिसतो. दोन्ही अभिनेत्री पूर्ण ताकदीने अर्जुनच्या मागे लागल्या आहेत. दोघांनाही अर्जुनला मिळवायचं आहे. अशा परिस्थितीत, शेवटी अर्जुनची पत्नी कोण होणार हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपटात पाहावा लागणार आहे. हा चित्रपट 21 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
'मेरे हसबंड की बीवी' चित्रपटाचा मनोरंजक ट्रेलर पाहा
: