न्यूयॉर्क : स्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपरहिरोंचे जनक स्टॅन ली यांचं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. अमेरिकेतील कॉमिक बुक संस्कृतीचे चेहरा म्हणून ओळख असलेल्या स्टॅन ली यांनी सोमवारी एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक वर्षांपासून त्यांना विविध आजारांनी ग्रासलं होतं.
28 डिसेंबर 1922 रोजी मॅनहॅटनमध्ये जन्मलेल्या स्टॅन ली यांनी 1961 मध्ये 'द फॅन्टॅस्टिक फोर'सह 'मार्वल कॉमिक्स'ची सुरुवात केली होती. यानंतर त्यात स्पायडर मॅन, एक्स मेन, हल्क, आयर्न मॅन, ब्लॅक पँथर, थोर, डॉक्टर स्ट्रेंज आणि कॅप्टन अमिरेका यांसारख्या सुपरहिरोंचा समावेश करण्यात आला.
या व्यक्तिरेखांवर नंतर चित्रपटही बनले, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. मार्वलच्या आतापर्यंतच्या जवळपास सर्वच चित्रपटांमध्ये स्टॅन ली यांनी कॅमियो केला होता. कॉमिक्ससह ली यांनी चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या. स्टॅन ली यांच्या कॉमिक्सचे चाहते जगभरात आहेत.
भारतीय सुपरहीरो फिल्म 'चक्र'
स्टॅन ली यांनी 2013 मध्ये त्यांचा पहिला सुपरहिरो चित्रपट 'चक्र' बनवला होता. कार्टून नेटवर्क, ग्राफिक इंडिया आणि पाओ इंटरनॅशनल यांनी बनवलेला 'चक्र : द इन्विजिबल' सिनेमा कार्टून नेटवर्कवर लॉन्च केला होता. हा चित्रपट राजू राय नावाच्या एका भारतीय तरुणाची कहाणी आहे, जो मुंबईत राहतो. राजू आणि त्याचे मार्गदर्शक डॉ. सिंह एक असा तांत्रिक पोशाख विकसित करतात, जो परिधान केल्यावर शरीरातील रहस्यमय चक्र सक्रिय होतात.
स्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपरहिरोंचे जनक स्टॅन ली यांचं निधन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Nov 2018 08:33 AM (IST)
28 डिसेंबर 1922 रोजी मॅनहॅटनमध्ये जन्मलेल्या स्टॅन ली यांनी 1961 मध्ये 'द फॅन्टॅस्टिक फोर'सह 'मार्वल कॉमिक्स'ची सुरुवात केली होती.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -