Ved Vaalvi Marathi Movies In Theater : बॉक्स ऑफिसवर (Box Office) सध्या 'वेड' (Ved) आणि 'वाळवी' (Vaalvi) हे दोन सिनेमे धुमाकूळ घालत आहेत. कोरोनानंतर दोन मराठी सिनेमे बॉक्स ऑफिस गाजवण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यासोबत कमाईच्या बाबतीतदेखील उजवे ठरले आहेत. 


रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) 'वेड' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊन चार आठवडे झाले असून या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. आतापर्यंत या सिनेमाने 55.22 कोटींची कमाई केली आहे. तर दुसरीकडे स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि सुबोध भावेच्या (Subodh Bhave) 'वाळवी'लादेखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 


'वाळवी' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात दीड कोटींचा टप्पा पार केला आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन नऊ दिवस पूर्ण झाले असून आतापर्यंत या सिनेमाने 2.54 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे लवकरच हा सिनेमा तीन कोटींच्या घरात जाईल. दुसरीकडे 'वेड' हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करत नाजराज मंजुळेच्या 'सैराट'चा रेकॉर्ड मोडू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


'वेड' आणि 'वाळवी' या दोन्ही सिनेमांची कथा भिन्न आहे. दोन्ही सिनेमातील कलाकार, कथा, त्यांचा चाहतावर्ग, त्यांचा अभिनय, सिनेमाची बांधणी अशा सर्वच गोष्टी निराळ्या आहेत. या सर्व गोष्टींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रेक्षकांना नाविन्य अनुभवायला मिळत आहे. 


कोरोनानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलेली फ्रेश जोडी आणि फ्रेश कथा सिनेरसिकांना पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवण्यात यशस्वी ठरली आहे. कोरोनामुळे सिनेप्रेमी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा पाहायला पसंती दर्शवत होते. पण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळवण्यात 'वेड' आणि 'वाळवी' या दोन्ही सिनेमांना यश आलं आहे. 
 
'वेड' या सिनेमाचं बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी कौतुक केलं आहे. तर 'वाळवी' या सिनेमाचं मराठी सिनेसृष्टीतील अनेक मंडळींनी खास पोस्ट लिहित कौतुक केलं आहे. सध्याच्या घडीला मराठी सिनेसृष्टी समृद्ध करण्यात हे दोन्ही सिनेमे यशस्वी झाले आहेत. अनेक सिनेमागृहांनी या दोन्ही सिनेमाचे शोज वाढवले आहेत. 


'वेड' बॉक्स ऑफिस कलेक्शन (Ved Box Office Collection) 


'वेड' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 20.60 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 20.18 कोटी, तिसऱ्या आठवड्यात 9.95 कोटींची कमाई केली आहे. चौथ्या आठवड्यातही या सिनेमाची घौडदौड सुरुच आहे. आतापर्यंत या सिनेमाने 55.22 कोटींचा गल्ला जमवला आहे. 






संबंधित बातम्या


PIFF : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावाची तारीख ठरली; 2 ते 9 फेब्रुवारी दरम्यान रंगणार महोत्सव