Tu Jhoothi Main Makkaar: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या  'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkaar) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. श्रद्धा आणि रणबीर हे पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत त्यामुळे 'तू झूठी मैं मक्कार'  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये रणबीर आणि श्रद्धा यांची रोमँटिक केमिस्ट्री दिसत आहे. 


तगडी स्टार कास्ट


'तू झूठी मैं मक्कार' हा एक मल्टिस्टारर चित्रपट आहे. या चित्रपटात रणबीर आणि श्रद्धा यांच्यासोबतच अनुभव सिंग बस्सी आणि डिंपल कपाडिया, बोनी कपूर हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटामधून अनुभव सिंग बस्सी हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील रणबीरच्या डायलॉग्सनं आणि श्रद्धाच्या लूक्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन लव्ह रंजन यांनी केलं आहे. तर चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली आहे. 


पाहा ट्रेलर:



चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज


'तू झूठी मैं मक्कार' हा चित्रपट 8 मार्च 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या चित्रपटाच्या ट्रेलरनं देखील अनेकांचे लक्ष वेधले आहे.  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


रणबीर आणि श्रद्धाच्या चित्रपटांना मिळाली प्रेक्षकांची पसंती 


'एक व्हिलन', 'हैदर', 'बागी', ​​'हाफ गर्लफ्रेंड', 'हसिना पारकर','बत्ती गुल मीटर चालू', 'स्त्री', 'छिछोरे' यांसारख्या चित्रपटांमधून श्रद्धा प्रेक्षकांच्या भेटीस आली. या चित्रपटांना प्रेक्षकांच्या भेटीस आली. तर रणबीर हा रॉकस्टार, बर्फी आणि ये जवानी है दिवानी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आला. हे चित्रपट हिट ठरले. रणबीर आणि श्रद्धा यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळे आता 'तू झूठी मैं मक्कार' हा त्यांचा आगामी चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल.




वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Entertainment News Live Updates 23 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!