Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या मराठी सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. नागराज मंजुळेचा सैराट 'Sairat) आणि रितेश देशमुखच्या 'वेड'च्या (Ved) तोडीसतोड हा सिनेमा आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. आता हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.


'बाईपण भारी देवा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Baipan Bhaari Deva Box Office Collection) 


सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.5 कोटींची कमाई केली आहे. तर रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात या सिनेमाने 12.4 कोटींची कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात 29.95 आणि तिसऱ्या आठवड्यात 21.24 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत आतापर्यंत या सिनेमाने 58.59 कोटींचा गल्ला जमवला आहे. 


नागराज मंजुळेंच्या 'सैराट' या सिनेमाने 110 कोटींची कमाई केली होती. तर रितेश देशमुखच्या 'वेड' या सिनेमाने 75 कोटींचा गल्ला जमवला होता. आता 'बाईपण भारी देवा' हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत असून सैराट आणि वेड यांच्या तोडीसतोड असल्याचं पाहायला मिळत आहे.






केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' सिनेमानं प्रदर्शना आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता.  सहा बहिणींच्या कथेच्या माध्यमातून 'बाईपण भारी देवा' सिनेमाने प्रत्येक स्त्रीला जगण्याचा नवा अर्थ देत स्वतःसाठी जगायला शिकवलं. सिनेमाच्या प्रदर्शनानंतर बॉक्सऑफिसवर त्याची सुरू असलेली घोडदौड प्रेक्षकांच्या पसंतीची मोठी पोचपावती म्हणावी लागेल. हा सिनेमा प्रदर्शनानंतर बॉक्सऑफिसवर कमाई करण्यासोबतच नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवताना दिसत आहे.


बाईपण भारी देवा' सिनेमात रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi),वंदना गुप्ते (vandana Gupte), सुकन्या मोने (Sukanya Mone),शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar), सुचित्रा बांदेकर (Suchita Bandekar) आणि दीपा परब (Deepa Parab) अशी अभिनेत्रींची तगडी स्टारकास्ट आहे. चित्रपटातील कलाकारांचा उत्तम अभिनय,उत्कृष्ट कथानक,सुरेल गाणी अन्   दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या अष्टपैलू दिग्दर्शनामुळे बॉक्सऑफिसवर मराठी चित्रपटाचा अनेक दिवसांनी बोलबाला झाल्याचं दिसून येत आहे.


संबंधित बातम्या


Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा'चं सगळंच भारी; लक्ष वेधणाऱ्या अभिनेत्रींच्या साड्यांच्या रंगांची खासियत माहितीये?