Raada : फुल्ल ऑफ अॅक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा' (Raada) सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर हवा करण्यास सज्ज झाला आहे. आता या सिनेमाचा ट्रेलर आणि सिनेमातील एक धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. 


नुकताच सिनेमातील कलाकारांच्या आणि गायकांच्या उपस्थितीत सिनेमाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा पार पडला. गणेश आचार्य, हिना पांचाळ यांनी धरलेला ठेका प्रेक्षकांना नक्कीच थिरकायला भाग पाडणार यांत शंकाच नाही. दरम्यान उपस्थित रसिक प्रेक्षक यांची कौतुकाची थाप, आशीर्वाद आणि पाठिंबा हे कलाकार आणि 'राडा' सिनेमासाठी उत्साहवर्धक आहे यांत शंका नाही. 


उत्कंठावर्धक आणि भन्नाट वेग असलेल्या 'राडा' सिनेमाचा दिमाखदार सोहळा नुकताच संपन्न झाला. 'राडा' सिनेमाचा ट्रेलर दाक्षिणात्य सिनेमाला टक्कर देणारा ठरत आहे. साऊथ स्टाईल टच असलेला हा भव्य सिनेमा आता केव्हा येणार याकडे प्रेक्षकांच्या नजरा वळल्या आहेत.


राम शेट्टी निर्मित 'राडा' या सिनेमाचा हिरो समा म्हणजेच अभिनेता आकाश शेट्टी तुप्तेवार 'राडा' या सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण करत आहे. तर राम शेट्टी निर्मित, रमेश व्ही. पारसेवार आणि सुप्रिम गोल्ड प्रस्तुत, सूरज फिल्म अँड एंटरटेनमेंट बॅनरचा आणि सहनिर्माता वैशाली पेद्दावार व पॅड कॉर्प - पडगीलवार कॉर्पोरेशन यांच्या या सिनेमात आकाश शेट्टीसह मिलिंद गुणाजी, संजय खापरे, गणेश यादव, अजय राठोड, गणेश आचार्य, निशिगंधा वाड,  योगिता चव्हाण, सिया पाटील, हिना पांचाळ, शिल्पा ठाकरे या कलाकारांना पाहणे रंजक ठरणार आहे. 


दिग्दर्शक रितेश सोपान नरवाडे यांनी सिनेमाचे दिग्दर्शन, संवाद आणि स्क्रीनप्ले अशा तीनही धुरा पेलवल्या आहेत. तर सिनेमाच्या संगीताची जबाबदारी दिनेश अर्जुना आणि मयुरेश केळकर यांनी सांभाळली असून गाण्याचे बोल जाफर सागर लिखित असून त्यापैकी एक गाणं विष्णू थोरे यांनी लिहिलं आहे. तर गायक जसराज, मधुर शिंदे यांनी चित्रपटातील गाण्यांना स्वरबद्ध केले आहे. 


ट्रेलर पाहून प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखीनच ताणली गेली असेल यांत शंकाच नाही. येत्या 23 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात 'राडा' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.



संबंधित बातम्या


Raada Marathi Movie : गणेशोत्सव होणार आणखी जल्लोषमय, 'राडा' चित्रपटातील 'मोरया मोरया' गाणे प्रेक्षकांच्या भेटीस!


Raada : मराठमोळ्या 'राडा'ला मिळालाय साऊथ स्टाईल टच, चित्रपटाच्या मोशन पोस्टरची सर्वत्र हवा!