Manoj Jarange : 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मनोज जरांगे यांच्या या बायोपिकची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. रोहन पाटील (Rohan Patil) या चित्रपटात मनोज जरांगे यांच्या भूमिकेला न्याय देत आहे. रोहन पाटीलआधी या चित्रपटासाठी एका लोककलावंताला विचारणा झाली होती. पण काही कारणाने त्यांना हा चित्रपट करता आला नाही. 


सिनेपत्रकार अमोल परचुरे यांच्या 'Catch Up'शोमध्ये नुकतचं डॉ. गणेश चंदनशिवे (Dr. Ganesh Chandanshive) यांनी हजेरी लावली. मराठवाड्यातून मुंबईत आलेले आणि मुंबईतून बॉलिवूडनगरी गाजवणारे डॉ. गणेश चंदनशिवे सध्या मुंबई विद्यापाठीच्या लोककला अकादमीचे प्रमुख आहेत. मनोज जरांगे यांच्या बायोपिकमध्ये डॉ. गणेश चंदनशिवे मुख्य भूमिकेत दिसणार होते. 


मनोज जरांगेंच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका न करण्याचं कारण काय? 


डॉ. गणेश चंदनशिवे म्हणाले की,"मी नाट्यशास्त्राचा विद्यार्थी असलो तरी अभिनय नाकारला. मला नाटक करता येईल पण नाटकाचे दौरे करता येणार नाहीत. डॉ. गणेश चंदनशिवे यांचं व्यक्तिमत्त्व मनोज जरांगे यांच्यासारखं असल्याने बायोपिकसाठी त्यांना विचारणा झाली होती. याबद्दल बोलताना डॉ. गणेश चंदनशिवे म्हणाले की,"मनोज जरांगे यांच्या बायोपिकसाठी दिग्दर्शकांनी मला विचारलं होतं. ते माझे चांगले मित्र असल्याने एक चांगली भूमिका देतो करशील का? असं त्यांनी मला विचारलं होतं".


डॉ. गणेश चंदनशिवे पुढे म्हणाले की,"चित्रपटातील व्यावसायिक गणिते वेगळी आहेत. ज्या निर्मात्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्याच्या मुलाला त्याला लॉन्च करायचं होतं. त्यामुळे जरांगे पाटील या भूमिकेसाठी त्याची निवड झाली. जरांगेंचा बायोपिक ही मोठी गोष्ट आहे. समाजासाठीचा त्यांचा लढा मोठा आहे. आता चित्रपटाच्या माध्यमातून आणखी काही लोकांपर्यंत त्यांचं काम पोहोचेल. पण मुळात माझी स्वप्न मोठी आहेत. मी केलं तर हॉलिवूड किंवा बॉलिवूडमध्ये काम करेल". 


महाराष्ट्रातील लोककला जगभरात पोहोचवणार : डॉ. गणेश चंदनशिवे


प्रसाद ओक शाहीर पठ्ठे बापूरावांवर चिरपत्र करतोय. साद ओक आणि मी सध्या या चित्रपटाच्या रिसर्चवर काम करतोय. मुळात प्रसाद ओक एक उत्तम अभिनेता आहे. लोककलेवर तो प्रचंड वाचन करतोय. चित्रपटासंबंधित गोष्टींवर तो माझ्यासोबत चर्चा करतोय. पठ्ठे बापूरावांचा चरित्रात्मक चित्रपट करायचा असेल तर त्याला ग्लोरिफाय करून चालणार नाही. जे आहे ते मांडायला हवं. समाजासमोर एका चांगला चित्रपट येणार आहे". 



संबंधित बातम्या


Gautami Patil : लावणी नखापासून केसापर्यंत शृंगाराने सजलेली, गौतमी पाटीलमुळे लावणी भ्रष्ट : डॉ. गणेश चंदनशिवे