Manoj Bajpayee Father Death: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी यांचे वडिल आर के वाजपेयी यांचे निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. आठवड्याभरापूर्वी त्यांना रूग्णालयामधून डिस्चार्ज मिळाला होता.
मनोज वाजपेयी यांच्या वडिलांची प्रकृती गेली काही दिवस गंभीर होती. त्यामुळे मनोज केरळमधील शूटिंग सोडून दिल्लीला रवाना झाले होते. मनोज वाजपेयी केरळमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाची शूटिंग करत होता. वडिलांची तब्येत खालावल्याचे कळताच तो केरळमधून दिल्लीला रवाना झाला.
मनोज वाजपेयीच्या वडिलांचे नाव राधाकांत वाजपेयी असे होते. ते एक शेतकरी होते. मनोजच्या स्टारडम आणि यशाचा त्याच्या वडिलांवर जराही परिणाम झाला नाही. त्यांनी त्यांचे शेवटचे दिवस अतिशय आरामात घालवले आहेत. मनोज वाजपेयींचे वडिल बिहारमधील त्यांच्या जुन्या घरीच राहायचे. मनोज वाजपेयी अखेरीस मसालेदार थ्रिलर वेब सीरिज द फॅमिली मॅनच्या दुसऱ्या पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या पर्वालादेखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. याचे दिग्दर्शन राज आणि डिके या जोडीने केले होते.
मनोज वाजपेयीने शबानासोबत 2006 साली लग्नबंधनात अडकला होता. मनोजसोबत लग्न झाल्यानंतर शबाना अभिनय क्षेत्रात जास्त दिसून आली नाही. मनोजला कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडते. त्याला सुट्टी असेल तेव्हा तो घरच्यांसोबतच वेळ घालवतो. मनोजने सोशल मीडियावर घरच्यांसोबचे खूपच कमी फोटो शेअर केले आहेत. मनोजच्या मुलीला त्याचे फॅमीली मॅन मधले काम आवडले होते.
मनोज वाजपेयीला 67 व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार देण्यात आला होता. तो एक दर्जेदार अभिनेता आहे. त्याच्या भोसले चित्रपटासाठी त्याला अनेक पारितोषिके मिळाली होती. त्याने भोसले चित्रपटावेळी तिसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी मनोज खूप भाऊक झालेला होता. मनोज शूटिंग नंतर घरी आल्यावर व्यायाम, पूजा, वाचन आणि उत्तम झोप घेत असतो.