Katrina Kaif Viral Video : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) 2021 मध्ये लग्नबंधनात अडकली आहे. कतरिनाच्या लग्नानंतर अनेकदा ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता पुन्हा एकदा अर्पिताच्या पार्टीत कतरिनाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं असून या पार्टीनंतर अभिनेत्रीच्या घरी छोटा पाहुण्याचं आगमन होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. 


अर्पिता आमि आयुष शर्माने आयोजित केलेल्या ईदच्या पार्टीनंतर कतरिना कैफ आई होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. कतरिनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कतरिना तिची ओढणी सावरत बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. 






अर्पिताच्या पार्टीत कतरिनाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती खूपच गोड दिसत होती. दरम्यान तिने पापराझींना पोझदेखील दिल्या. फोटोसाठी पोझ देताना ती सारखी तिची ओढणी सावरताना दिसत आहे. त्यावेळी बहुतेकवेळा तिचा हात तिच्या पोटावर होता. त्यामुळे आता नेटकरी ती प्रेग्नंट असल्याची आणि बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा अंदाज बांधत आहेत. 


कतरिना-विकीचं बिनसलं?


ईदनिमित्त अर्पिताने आयोजित केलेल्या पार्टीत बॉलिवूड अवतरलं होतं. पण विकी कौशलने मात्र या पार्टीत हजेरी लावली नाही. त्यामुळे कतरिनाच्या व्हिडीओवर विकी कुठे आहे?, कतरिना-विकीचं बिनसलं? विकी-कतरिनाचा घटस्फोट होणार? अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 


ईदनिमित्त अर्पिताने खान आणि आयुष शर्माने आयोजित केलेल्या पार्टीत बॉलिवूडचे अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी सहभागी झाले होते. आमिर खान, कार्तिक आर्यन, प्रीती झिंटा, सोनाक्षी सिन्हा, जहीर इकबाल, एमएस धोनीची पत्नी साक्षी, शहनाज गिल आणि मनीष पॉलसह अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. 


कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच अडकले लग


कतरिना कैफ आणि विकी कौशल डिसेंबर 2021 मध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या शाही लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. कतरिना आणि विकीने राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्टमध्ये सात फेरे घेतले होते. 


संबंधित बातम्या


Katrina kaif : "माझ्या घरातील सर्वात मौल्यवान व्यक्ती म्हणजे माझा नवरा" : कतरिना कैफ