Manasi Naik: अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) ही तिच्या नृत्यशैलीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. मानसी ही सोशल मीडियावर विविध रिल्स आणि फोटो शेअर करते. तिच्या सोशल मीडियावर पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. नुकतीच मानसीनं गप्पा मस्ती पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुले या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये मानसीनं विविध विषयांवर चर्चा केली.
रिल्सबाबत काय म्हणाली मानसी नाईक?
मानसी ही विविध गाण्यांवरील डान्सचे रिल्स सोशल मीडियावर शेअर करते. या रिल्सबाबत मानसी नाईकनं सांगितलं, 'मला एक खूप मोठा दिग्दर्शक म्हणाला होता की, तू अजून रिल्स का करतेस? लोकांना प्रश्न पडतो की, एवढी मोठी कलाकार असूनही का रिल्स करते? मी त्या दिग्दर्शकाला सांगितलं होतं की, मी मोठी कलाकार नाही, मला मोठं व्हायचंय. दुसरी गोष्ट मला चित्रपट मिळत नाहीये म्हणून मी रिल्स करतीये.'
पुढे तिनं सांगितलं, 'चित्रपट न मिळण्याची खंत ही कोणत्याही कलाकाराला असते, मलाही आहे. मी कोणत्याच कामाला नाही म्हणत नाही. मला कष्ट करायला आवडतात.'
किसिंग सिन
भार्गवीनं मुलाखतीमध्ये मानसीला तिच्या पहिल्या चित्रपटामधील किसिंग सिनबाबत विचारलं होतं. तेव्हा मानसी म्हणाली, 'मी त्या चित्रपटात एक नाही तर दोन किसिंग सिन केले होते.'
चंद्रमुखी चित्रपटाबाबत मानसी म्हणाली, 'एकदा मी, विश्वास सर, सुबेध सर आम्ही तिघे जेव्हा चंद्रमुखी चित्रपटाबाबत बोलत होते. तेव्हा सुबोध भावे हे हा चित्रपट दिग्दर्शित करणार होते. तेव्हा ते म्हणाले, 'चंद्रमुखी तू' . ही घटना मी कोणाचही नाव न घेता एका मुलाखतीमध्ये सांगितली. मला प्रसाद ओक यांनी चंद्रमुखीसाठी कधीच अप्रोच केलं नव्हतं. मला जेव्हा चंद्रमुखी चित्रपटाबद्दल विचारण्यात आलं होतं, तेव्हा दिग्दर्शक, निर्माते सगळंच वेगळं होतं.'
'माझी या गोष्टीवरुन खिल्ली उडवण्यात आली होती. एका अभिनेत्रीनं मला फोन केला होता, मला विचारायला की, 'तू असं का बोललीस?' तेव्हा ती अभिनेत्रीनं मला खूप बोलली होती.' असंही मानसीनं सांगितलं.
संबंधित बातम्या
Manasi Naik : "माझं खरं खोटं देवालाच ठाऊक"; मानसी नाईकची लक्षवेधी पोस्ट