Mamta Kulkarni : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी महामंडलेश्वर होण्यावरून वाद निर्माण झाला आहे. किन्नर महामंडलेश्वर हिमांशी सखी यांनी उपस्थित प्रश्न केलं. हिमांशी सखी यांचं म्हणणं आहे की, एका महिलेला महामंडलेश्वर का बनवण्यात आलं? 'जर तुम्हाला हे करायचे असेल तर त्याचे नाव किन्नर आखाडा का ठेवले आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 


महिला किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर कशी?


किन्नर महामंडलेश्वर हिमांशी सखी यांनी ममता कुलकर्णीच्या महामंडलेश्वर होण्यावर प्रश्न उपस्थित केले. किन्नर आखाडा किन्नरांसाठी आहे, एका महिलेला महामंडलेश्वर का बनवण्यात आलं. जर प्रत्येक वर्गाला महामंडलेश्वर बनवायचे असेल, तर आखाड्याला किन्नर का म्हणतात, असं हिमांगी सखी यांनी म्हटलं आहे.


ममता कुलकर्णी महामंडलेश्वर होण्यावरून वाद


अभिनेत्री ममता कुलकर्णी प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याला पोहोचली आहे. ती इथे संतांच्या वेशात कुंभमेळ्यात दाखल झाली. अंगावर भगवे कपडे परिधान करून, गळ्यात रुद्राक्षाचे अनेक मणी आणि खांद्यावर पिशवी लटकवून ती किन्नर आखाड्यात पोहोचली होती. आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. येथे त्यांनी आचार्य महामंडलेश्वर यांच्याशी महाकुंभ आणि धर्म आणि अध्यात्म या विषयांवर सुमारे तासभर चर्चा केली. 


ममता कुलकर्णीची प्रतिक्रिया काय?


ममता कुलकर्णी म्हणाली, महाकुंभला येणे आणि येथील भव्यता पाहणे, हा त्यांच्यासाठी अविस्मरणीय क्षण असेल. या महाकुंभाच्या पावन पर्वाचा मी साक्षीदार होऊन येथील संतांचे आशीर्वाद घेत आहे, हे माझे भाग्यच म्हणावं लागेल.


अभिनेत्री ममता कुलकर्णीची बॉलिवूड कारकिर्द


ममता कुलकर्णीने बॉलिवूडच्या शेकडो चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्री म्हणून तिने छुपा रुस्तम, सेन्सॉर, जाने-जिगर, चायना गेट, किला, क्रांतीकारी, जीवन युद्ध, नसीब, बेकाबू, बाजी, करण अर्जुन, तिरंगा यांसारख्या चित्रपटांमध्ये नेतृत्व केले आहे. जेव्हा ती किन्नर आखाड्यात पोहोचली तेव्हा तिथे उपस्थित लोकांनी तिच्यासोबत फोटो आणि सेल्फी काढण्यास सुरुवात केली. जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी जय अंबानंद गिरी यांनी महाकुंभ व आखाड्यांची माहिती दिली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Who is Afsar Zaidi : तैमूर किंवा इब्राहिम नाही, मग सैफला रुग्णालयात कुणी नेलं? मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती उघड, कोण आहे अफसर जैदी?