नवी दिल्लीः बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी तब्बल 10 वर्षांनी कॅमेरासमोर आली आहे. ममता कुलकर्णीवर सध्या ड्रग्ज रॅकेटचा आरोप आहे. एबीपी न्यूजच्या प्रतिनिधी शीला रावल यांना दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत ममता कुलकर्णीने अनेक बाबींवर खुलासा केला आहे.


 

 

ममता कुलकर्णीने बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड यांच्या बाबतीत अनेक गौप्यस्फोट केले. या मुलाखतीत ममता कुलकर्णीने आपल्यावर असलेल्या ड्रग्जच्या आरोपावरही खुलासा केला.

 

प्रश्नः ममता ज्या मुंबईने, ज्या महाराष्ट्राने, ज्या देशाने तुला एवढी लोकप्रियता मिळवून दिली, त्याच ठिकाणी आज तुझ्यावर गंभीर आरोप लावले जात आहेत. सत्य काय आहे?

 

उत्तरः सत्य काय आहे, ते माझ्या मनालाच माहित आहे. माझ्यावर जाणीवपूर्वक आरोप लावले जात आहेत. परिस्थिती काहीही असो, देव मला न्याय देईल. देवाच्या न्यायालयात खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं होतंच.

 

 

प्रश्नः तू जेव्हा लोकप्रियतेच्या जगात प्रसिद्ध होतीस, तेव्हा तुझ्या एका फोटोमुळे तू वादात सापडली होतीस, तुझ्यावर केसही झाली होती.

 

उत्तरः तेव्हा मला या जगातलं काही माहित नव्हतं. मी अज्ञानी होते. आज जर मला अशी ऑफर मिळाली तर कोणत्याही किमतीवर ती स्वीकारणार नाही.

 

 

प्रश्नः तू तुझ्या आत्मचरित्रामध्ये अनेक खुलासे केले आहेस. तुला बॉलिवूड सोडून जेलमध्ये बंद असलेल्या विकी गोस्वामीकडे जाण्याची इच्छा का झाली?

 

उत्तरः असं काही नाही, असं असतं तर..

 

 

प्रश्नः तुझ्या आत्मचरित्रामध्ये बहुतेक या गोष्टीचा उल्लेख आहे..

 

उत्तरः नाही..

 

 

प्रश्नः मी पुन्हा मूळ मुद्द्यावर येते. विकी दुबईत जेलमध्ये होता तेव्हा तू एक सुपरस्टार होतीस, मग तुला त्याच्याकडे जायचंच होतं, तर त्याला काही खास कारण असेल ना.. तुमचं प्रेम होतं का?

 

उत्तरः त्यावेळी माझी तपश्चर्या संपली होती आणि मी 2012 साली कुंभमेळ्यात गेले होते. विकीने तगादा लावला होता की, मला वेगळ्या पद्धतीने अटक करण्यात आली आहे...असो,  तेव्हाची वेळच वेगळी होती.