Kochu Preman: मल्याळम चित्रपटसृष्टीतील आणि छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेते कोचु प्रेमन (Kochu Preman) यांचे शनिवारी (3 डिसेंबर) निधन झाले. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोचु प्रेमन यांच्या निधनानं मल्याळम मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कोचु प्रेमन यांनी नाटकामधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्यांनी करिअरच्या सुरुवातीच्या काळात विनोदी भूमिका साकारल्या. तसेच अनेक मल्याळम मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. 
 
कोचु प्रेमन यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बिघडली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अभिनेता पृथ्वीराज आणि नादिर शाह यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कोचू प्रेमन यांना श्रद्धांजली वाहिली. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि नेते व्ही डी सतीसन यांच्यासह मल्याळम चित्रपट आणि मालिकांमधील कलाकारांनी त्यांच्या कोचु प्रेमन यांचे निधन झाल्यानंतर शोक व्यक्त केला.


केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची पोस्ट








250 चित्रपटांमध्ये केलं काम


कोचु प्रेमन यांनी जवळपास 250 चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या विनोदी व्यक्तीरेखांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. गुरु (1997), थेनकसीपट्टणम (2000), पप्पी अप्पाचा (2010) आणि लीला (2016) यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केलं. ओरु पप्पडवदा प्रेमम (2021) हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Entertainment News Live Updates 4 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!