Gangubai Kathiawadi : 'ऑस्कर' (Osar) हा सिनेसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. यंदा 'द कश्मीर फाइल्स' आणि 'आरआरआर' या सिनेमांना ऑस्करसाठी न पाठवता 'छेल्लो शो' या गुजराती सिनेमाला ऑस्करसाठी पाठवल्याने अनेक वाद झाले. आता बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या (Alia Bhatt) 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) या सिनेमाला पुढील ऑस्करसाठी पाठवण्याची तयारी सुरू असल्याचं समोर आलं आहे. 


'गंगूबाई काठियावाडी' हा सिनेमा आता 'ब्रिटिश अकादमी फिल्म अवॉर्ड (BAFTA) 2022' या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यासाठी सज्ज होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट पटकथा या श्रेणींमध्ये या सिनेमाला ऑस्करसाठी पाठवण्यात येणार आहे. 






'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमात आलिया भट्टसह, अजय देवगण, विजय राज, शांतनु माहेश्वरी, सीमा पाहवा, जिम सभ्र महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. संजय लीला भन्साळी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 129.10 कोटींची कमाई केली आहे. आता हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील प्रदर्शित झाला आहे. 


'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाचं कथानक काय?


'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमात आलिया भट्ट गंगूबाईच्या भूमिकेत आहे. गंगूबाईला तिच्या नवऱ्याने 500 रुपयांना विकलं होतं. त्यानंतर गंगूबाईचं आयुष्य कसं होतं, तिला आयुष्यात कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागला हे 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमात पाहायला मिळेल. 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित हा सिनेमा आहे. एक सामान्य मुलगी कामाठीपुराची क्वीन कशी बनते हे या सिनेमात प्रेक्षक पाहू शकतात. 


संबंधित बातम्या


Gangubai Kathiawadi : गंगूबाईचा नवा रेकॉर्ड; नेटफ्लिक्सवरदेखील आलिया भट्टचा बोलबाला