मुंबई : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याची चर्चा बऱ्याच महिन्यांपासून आहे. पहिल्यांदा त्यांची जवळीक चर्चेचा विषय होती, सध्या त्यांच्या लग्नाची चर्चा आहे. एवढंच नाही तर त्यांच्या लग्नाची तारीखही निश्चित झाल्याचं वृत्त आहे. मात्र यावर मलायका अरोराने मौन सोडलं आहे.
पुढच्याच महिन्यात म्हणजेच 19 एप्रिलच्या मुहूर्तावर मलायका-अर्जुन लगीनगाठ बांधणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ख्रिश्चन पद्धतीने मलायका-अर्जुन विवाहाच्या आणाभाका घेणार असल्याची वृत्त आहे.
परंतु नव्या माहितीनुसार, हे वृत्त खरं नाही. 'बॉम्बे टाइम्स'ने मलायकाला तिच्या लग्नाच्या तारखेविषयी विचारलं असता, ती म्हणाली हे खरं नाही. तर अर्जुनचे वडील बोनी कपूर यांनीही हे वृत्त चुकीचं असल्याच सांगितलं होतं.
मलायका-अर्जुनच्या अफेअरची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमध्ये रंगली आहे. मात्र दोघांनीही आपल्या नात्याची जाहीर वाच्यता अद्याप केलेली नाही. दोघं हातात हात घालून एकमेकांसोबत फिरताना अनेक वेळा दिसल्यामुळे अर्जुन-मलायका डेटिंग करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाल्याचं वृत्त पसरलं होतं.
मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला होता. 18 वर्षांच्या संसारानंतर ते विभक्त झाले होते. त्यांना अरहान हा 16 वर्षांचा मुलगा आहे. अरबाजही गर्लफ्रेण्ड जॉर्जिया अँड्रियानीसोबत लग्न करणार असल्याचं म्हटलं जातं.
अर्जुन कपूरसोबत लग्नाच्या वृत्तावर मलायका अरोराचं उत्तर!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Mar 2019 09:07 AM (IST)
मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला होता. 18 वर्षांच्या संसारानंतर ते विभक्त झाले होते. त्यांना अरहान हा 16 वर्षांचा मुलगा आहे. अरबाजही गर्लफ्रेण्ड जॉर्जिया अँड्रियानीसोबत लग्न करणार असल्याचं म्हटलं जातं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -